पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/208

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे यानंतर वर्षभरातच सोव्हिएत युनियनने पाकिस्तानला शस्त्रे देण्याचा करार केला असे, . जाहीर झाले. अजूनपर्यंत अमेरिका आणि चीन पाकिस्तानला मदत करीत होती. तोपर्यंत उजव्या कम्युनिस्टांना सोयीचे प्रचारी राजकारण करता येत होते. रशियाने शस्त्रे द्यायला आरंभ केल्यानंतर वास्तविक उजव्या कम्युनिस्टांनी रशियन सरकारवर टीका करायला हवी होती. परंतु त्यांनी टीका केली नाही यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. रशियाने पाकिस्तानला शस्त्रे दिल्यामुळे उलट रशियाचा पाकिस्तान सरकारवर प्रभाव कसा वाढेल आणि पाकिस्तानला रशिया कसा कह्यात ठेवील हे उजवे कम्युनिस्ट तेथे सांगू लागले. एकूण पाकिस्तानला शस्त्रे पुरविण्याचे रशियन धोरण भारताच्याच फायद्याचे आहे अशी ही तर्कदष्ट भूमिका होती. रशियाला बहुधा पाकिस्तानवरील चीनचा प्रभाव कमी करावयाचा असावा. हे शक्य होत नाही हे दिसून आल्यामुळे आणि भारतातील दुखावलेल्या जनमताची दखल घ्यावीशी वाटल्यामुळे असेल, कालांतराने रशियाने हा शस्त्रपुरवठा बंद केला. जनमताची फारशी दखल रशियन सरकार घेत नाही. परंतु येथे रशियासमोर एक विशिष्ट परिस्थिती उभी राहिली होती. मध्यपूर्वेतील रशियाच्या राजकारणाला प्रचंड अपयश आले होते. इजिप्तमधून. सादत याने . रशियनांची हकालपट्टी केली होती. अशावेळी भारतासारख्या देशाला दुखावण्यात अर्थ नाही असे रशियन नेत्यांना वाटण्याची शक्यता असावी.
 बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामानंतर परिस्थिती बदलली. पुढे भारत-सोव्हिएत मैत्री करार झालेला आहे. त्यामुळे उजव्या कम्युनिस्टांची भूमिका पुन्हा बदलली आहे. आता ते पुन्हा पाकिस्तानविरोधी बनले आहेत. अखेर रशियन परराष्ट्र धोरणाची तळी उचलून धरायचेच ठरविल्यानंतर याहून वेगळ्या भूमिकेची अपेक्षाच करणे चुकीचे आहे.

 कम्युनिझम् आणि इस्लाम यांच्यातील साम्य-विरोधाचे स्वरूप या संदर्भात समजावून घेणे योग्य ठरेल. कम्युनिस्टांना मुस्लिम समाजाविषयी आकर्षण वाटावे यामागे कम्युनिझमच्या काही परंपरा आहेत. कम्युनिझम म्हणजे विसाव्या शतकातील इस्लाम असे एका पाश्चिमात्य विचारवंताने म्हटले आहे त्याची येथे आठवण येते. ईश्वरविषयक कल्पना वगळली तर या दोन समाजव्यवस्थांत आपल्याला बरेच साम्य आढळून येईल. एक तर कम्युनिस्टांना मतभेद अमान्य असतो. मुसलमान समाजही मतस्वातंत्र्य मानायला तयार नसतो. थोडक्यात वैचारिक : स्वातंत्र्याचा अभाव ही कम्युनिस्ट व इस्लाम या समाजव्यवस्थांची खास वैशिष्ट्ये आहेत. लोकशाहीला दोन्ही समाजव्यवस्थांत स्थान नाही. अल्पसंख्यांक असताना सत्ता हस्तगत करण्याची आकांक्षा कम्युनिस्ट आणि मुसलमान दोन्हीही बाळगत असतात. आज माओ 'रिव्हिजनिस्ट', 'डीव्हिएशनिस्ट' अशी शेलकी विशेषणे रशियन कम्युनिस्टांना उद्देशून वापरतात. कुराणात प्रेषितांचा आदेश न मानणाऱ्यांना व अरबस्तानातील ज्यू व ख्रिश्चन जमातींना उद्देशून हेच शब्दप्रयोग करण्यात आले आहेत. त्यांच्या प्रेषितांनी दाखविलेल्या मार्गापासून पदच्युत झाले असे त्यांच्याविषयी म्हटले आहे. रशियात प्रारंभी तेथल्या मुस्लिम जनतेला कम्युनिस्ट समाजव्यवस्थेत सामावून घेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून प्रेषित महंमदाची स्तुती आरंभण्यात आली होती. प्रेषित महंमद हा पहिला समाजवादी असे त्याचे वर्णन करण्यात आले होते. या प्रचाराला यश आले नाही. कदाचित त्यांच्या हे लक्षात आले नसावे की

समारोप / २०७