पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
..
भारतीय इस्लाम

 भारतातील इस्लामचे स्वरूप, भारतात इस्लामचे आगमन ज्या प्रकारे झाले आणि ज्याप्रकारे त्याचा विस्तार झाला त्या संदर्भात समजून घेतले पाहिजे. इस्लामचे आगमन येथे शांततापूर्ण मार्गाने झालेले नाही. ते हिंसक पद्धतीने झाले. शिवाय मुसलमान उपखंडात सर्वसाधारणपणे अल्पसंख्यांक राहिले आहेत.
 इस्लामच्या इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण वस्तुस्थिती आहे असे म्हटले पाहिजे, कारण मुसलमान जेथे विजेते म्हणून गेले तेथील बहुसंख्य किंवा सगळीच्या सगळी प्रजा कालांतराने मुसलमान बनली आहे. इस्लामच्या स्थापनेच्या इतिहासाशी आपल्याला काहीच कर्तव्य नाही. परंतु या स्थापनेनंतर अत्यंत अल्पावधीत इस्लामी साम्राज्याचा आणि पर्यायाने धर्माचा जो प्रचंड विस्तार झाला त्याची कारणे इस्लामच्या स्थापनेच्या इतिहासात शोधावी लागतील. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रेषित महंमद हे इस्लामचे केवळ धर्मसंस्थापक नसून राज्यसंस्थापकही आहेत आणि राज्य (स्टेट) आणि धर्म यांची सांगड इस्लामच्या प्रस्थापनेपासून घातली गेली आहे. आपल्याला नव्या धर्माचा प्रसार करता येत नाही. (किंवा नवा धर्म पाळता येत नाही) म्हणून महमद मदिनेला गेले. परंतु मदिनेला त्यांनी केवळ धर्मप्रसाराचेच कार्य केलेले नाही, त्यांनी आपले राज्य स्थापन केले.
 या घटनेने इस्लामच्या चळवळीला एक विशिष्ट दिशा-सत्तासंपादनाची दिशा-दाखवून दिली. धर्मसंस्थापनेबरोबरच राज्य स्थापन झाले. परंतु राज्यविस्तार धर्मविस्तारावर आधारलेला राहिला नाही. किंबहुना राज्यसत्तेने धर्मविस्तार घडवून आणलेला आहे. इ. स. ६३२ साली