पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजाचे मिळत असलेले सर्व फायदे आपल्या विशिष्ट मतप्रणालीचा प्रसार करण्यासाठी वापरण्याचे हे तंत्र नवे नाही.
 बांगला देशमध्ये २६ मार्च १९७१ रोजी पाकिस्तानने अमानुष दडपशाही सुरू केली. जयप्रकाशजींसारखे मानवतावादी खवळून उठले. आता भारताने शस्त्रबळ वापरल्याखेरीज हा प्रश्न मिटणारा नाही असे त्यांनी प्रतिपादन करायला सुरुवात केली. आपले प्रिय पाकिस्तान मोडणार या भयाने कासावीस झालेल्या तय्यबजींनी एका लेखात जयप्रकाशजींवर कडाडून हल्ला चढविला. (पहा - Indian Express.) 'मद्य न घेणाऱ्या माणसाला थोडेसेही मद्य घेतल्याने अहंकारनशा चढते तसे जयप्रकाशांचे झाले आहे, त्यांना हिंसेची नशा चढली आहे' असे त्यांनी लिहिले. निर्वासितांना येऊ दिले ही चूक केली, त्यांना जबरदस्तीने हाकलून दिले पाहिजे, पाकिस्तानच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करता कामा नये, इत्यादी नेहमीची मुस्लिम जातीयवादी प्रचारकांची भूमिका यांनी मांडली आहे. या देशाच्या संकटांपेक्षा पाकिस्तानच्या ऐक्याचीच काळजी तय्यबजींना जास्त वाटत होती हे लेखाचा एकूण आशय पाहिल्यानंतर स्पष्ट होत होते. वस्तुतः हा लेख त्यांनी लिहिला तेव्हा पाकिस्तानी सैन्य मोकाट सुटले होते, निर्वासितांना परत घ्यायला याह्याखानांची तयारी नव्हती. मग यांना आपण कसे परत पाठवायचे? थोडक्यात, त्यांना जबरदस्तीने हाकलल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्यावर खुशाल गोळ्या झाडाव्यात असे तय्यबजी यांना सुचवायचे होते. हे तय्यबजींनी लिहिले याचे कारण नव्वद टक्के निर्वासित हिंदू होते. ते जगले काय किंवा मेले काय, तय्यबजींना त्याचे काहीच सोयरसुतक नव्हते. त्या सबंध लेखात त्यांनी एका शब्दानेही पाकिस्तानला दोष दिलेला नाही. भारत या बंडखोरांना साहाय्य करीत आहे यावरच त्यांच्या टीकेचा रोख आहे. परंतु आपली पाकधार्जिणी भूमिका लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून 'याह्याखानांनी इस्लामची उदात्त परंपरा अत्याचार करून मोडली.' असे एक वाक्य लिहिले आहे. या क्लृप्त्या न कळण्याइतके या देशातील सुजाण वाचक मूर्ख आहेत असे तय्यबजींना वाटते ही खरी गंमत आहे. वस्तुत: याह्याखानांनी इस्लामची उदात्त परंपरा मोडली असे म्हणणे हा शुद्ध विनोद आहे. इस्लामची कोणती नेमकी मानवतावादी उदात्त परंपरा याह्याखान यांनी मोडली हे उदाहरणे देऊन श्री. तय्यबजी यांनी सांगितले असते तर बरे झाले असते. वस्तुत: याह्याखान इस्लामच्या कठोर बळ वापरण्याच्या परंपरेप्रमाणेच वागले आहेत. नेहमीप्रमाणे याह्याखान वागले त्या पद्धतीनेच इस्लामी राजकारण चालत आलेले आहे. जीना याच परंपरेचे बळी होते. हे त्यांनी दंगली केल्यानंतर सिद्ध झाले. गेल्या पंचवीस वर्षांत पाकिस्तानातून अल्पसंख्यांकांची हकालपट्टी या तथाकथित उदात्त परंपरावाल्यांनीच केली आहे. वस्तुस्थिती अशी आहे की उदात्त, मानवतावादी परंपरा इस्लामच्या समाजधारणेत रुजविणारा महापुरुष अजून जन्माला यावयाचा आहे.

 येथे काही तथाकथित राष्ट्रीय मुसलमानांचे वर्तन तपासून पाहणे आवश्यक आहे. प्रत्येक राज्यात स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसमध्ये असलेल्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जातीयवादी भूमिका घेण्यात मुस्लिम लीगशी स्पर्धा करण्याचे धोरण अवलंबिले. शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर श्रीमती इंदिरा गांधी यांनी हुमायून कबीर यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून

१५६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान