पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

that I am Nacrasov." श्री दासगुप्ता यांचा गायब झालेल्या कागदपत्रांचा पुरावा हा जीना हे जास्तीत जास्त दुसरे नसोव्ह होते हे सिद्ध करतात.
 परंतु बद्रुद्दीन तय्यबजी यांना आपले जीना-प्रेम आणि गांधी-द्वेष व्यक्त करण्याची एक सुवर्णसंधी त्या लेखाने आपोआप मिळवून दिली. 'वीकली' मध्ये लिहिलेल्या प्रतिक्रियात्मक पत्रात तय्यबजी यांनी 'गांधी हे हिंदू पुनरुत्थानवादी असल्यामुळे एक प्रतिक्रिया म्हणून जीनांनी धर्मवादी व जातीयवादी राजकारणाचा आश्रय घेतला' असे प्रतिपादन केले. गांधीनी राजकारणात जनतेला आकर्षित करण्यासाठी हिंदू धर्मप्रतीके वापरली. तय्यबजी यांच्या प्रतिपादनाचा आशय पाहिला तर धर्म न मानणारे जातीयवादी धर्मनिरपेक्षतावादी ठरतात आणि धर्म मानणारी धर्मनिरपेक्ष मंडळी जातीयवादी ठरतात. गांधीजी धर्म मानीत होते म्हणून ते जातीयवादी होते. जीना आधुनिक पोषाख करीत होते म्हणून ते धर्मनिरपेक्षतावादी होते. या न्यायाने सावरकर धर्मनिरपेक्षतावादी ठरले पाहिजेत, कारण ते जीनांप्रमाणे हिंदू धर्मप्रतीके वापरीत नव्हते. आधुनिक वेष करीत होते आणि जीनांप्रमाणेच काट्या-चमच्याने जेवत होते. गाय पवित्र नाही, गाय हा एक पशू आहे, असे (महाक्रांतिकारक) विधान १९२८ सालच्या एका लेखात त्यांनी केलेले आहे. तय्यबजी यांच्या धर्मनिरपेक्षतावादाच्या आणि आधुनिकतेच्या सर्व कसोट्यांना ते उतरतात. तय्यबजी त्यांना धर्मनिरपेक्षतावादी मानतात काय? 'नाही' असे त्याचे उत्तर आहे. सावरकर आणि जीना यांना तय्यबजी वेगळी मोजमापे का लावतात असां आपल्याला प्रश्न पडेल. त्याचे उत्तर सोपे आहे. हिंदू आणि मुसलमान व्यक्तींचे वेगवेगळ्या मोजमापाने मूल्यमापन करण्याचे एक तंत्र मुस्लिम जातीयवाद्यांनी ठरवून ठेवले आहे. या मोजमापाप्रमाणे कट्टर धर्मनिरपेक्षतावादी हिंदू जातीयवादी ठरतो आणि कट्टर जातीयवादी मुसलमान धर्मनिरपेक्षतावादी ठरविला जातो. तय्यबजी यांच्या या मोजमापाप्रमाणे धर्मप्रतीके वापरणारा येशू-ख्रिस्त पुनरुज्जीवनवादी म्हटला पाहिजे आणि धर्माची भाषाही न वापरणाऱ्या, आधुनिक वेष करणाऱ्या व काट्या-चमच्याने जेवणाऱ्या हिटलरने साठ लाख ज्यूंना यमसदनास पाठविले तरी त्याला आपण उदारमतवादी व पुरोगामी म्हटले पाहिजे. तय्यबजी बहुधा भारतातील पुनरुज्जीवनवादी हिंदूंना पुरोगामी बनविण्यासाठी येथे राहिले असावेत असे त्यांच्या लिखाणावरून वाटते. कारण मुसलमानांना पुरोगामी बनविण्याचे कार्य जीनांनी पूर्ण केलेले असल्यामुळे आता करण्यासारखे काही उरलेले नाही.

 हिंदू नेते आणि हिंदू समाज यांच्या जातीयवादामुळे हिंदू-मुस्लिम समस्या मिटली नाही असे मानणारे आणि भारत-पाकिस्तान वादात पाकिस्तानची भूमिका बरोबर आहे असे म्हणणारे नूराणी, लतीफी आणि तय्यबजी इत्यादी मंडळी अखेरीला भारतात राहण्याचे पसंत का करतात असा एक प्रश्न वाचकांना सतावण्याचा संभव आहे. याचे उत्तर हाँगकाँगमध्ये राहणाऱ्या चिन्यांची मनोभूमिका समजावून घेतल्यास लक्षात येईल. तेथील बरेचसे चिनी लाल चीनहून हाँगकाँगला आलेले आहेत. आणि कम्युनिस्ट राज्यपद्धती आणि माओचे धोरण कसे बरोबर आहे हे ते हाँगकाँगमध्ये बसून सांगत असतात. "आपण मग लाल चीनला का जात नाही?" असे जर त्यांना कुणी विचारले तर “येथल्या स्वतंत्र समाजाचे फायदे आम्हाला तेथे मिळणार नाहीत म्हणून." असे उत्तर ते देतात. लोकशाहीवादी स्वतंत्र

भारतीय मुसलमान /१५५