पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/155

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांचा विरोध आहे. भारताने इंडोनेशियातल्या मुस्लिम चळवळीला विरोध केल्यामुळे इंडोनेशिया-भारत संबंध बिघडले असे चक्क खोटे विधान केले आहे. वस्तुत: इंडोनेशियाची राज्यपद्धती कशी असावी यासंबंधी भारताने कधीही आणि काहीही म्हटलेले नाही. भारत आणि नेपाळ यांचे संबंधही ताणलेले होते. भारताने नेपाळला 'तुमची राज्यव्यवस्था धर्मनिरपेक्ष बनवा' असे सांगितल्यामुळे हे संबंध बिघडले असे मात्र तय्यबजी सांगत नाहीत. जणू मुस्लिम राष्ट्रांच्या इस्लामविषयक पद्धतीला भारत विरोध करतो आहे, म्हणून भारत व मुस्लिम राष्ट्रांचे संबंध बिघडत आहेत असे सांगण्याची तय्यबजींची ही लबाडी आहे. भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध का बिघडले आहेत? तय्यबजी यांच्या मते पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र असायला भारताने सतत केलेल्या विरोधामुळे हे संबंध सुधारण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. (पहा - तय्यबजी यांचा लेख.) फाळणीच्या वेळी भारत-पाकिस्तान यांच्यात मालमत्ताविषयक व अर्थविषयक वाटप झाले; परंतु पाकिस्तानचा राजकीय प्रभाव जो असायला पाहिजे तेवढा ठेवण्याबाबत वाटप पूर्ण झालेले नाही असे ते म्हणतात आणि पर्यायाने पाकिस्तानला भारताएवढे राजकीय प्रभुत्व उपभोगिता आले पाहिजे आणि भारताने त्याला मान्यता दिली पाहिजे असे ते सुचवितात. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणारे हे गृहस्थ सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर मुस्लिम जातीयवादी राजकारण करू लागले. भारतपाकिस्तान वादात पाकिस्तानची भूमिका मूलतः बरोबर आहे असे मानणारे हे गृहस्थ भारताच्या परराष्ट्र खात्यात जबाबदारीच्या अधिकारावर होते! पाकिस्तानचे बरोबर आहे असे मानणाऱ्या या गृहस्थाने एक तर परराष्ट्र खात्यात असताना भारताचे परराष्ट्रीय धोरण पाकिस्तानच्या धोरणाला अनुकूल बनविण्याचा प्रयत्न केला असेल किंवा आपल्या मनाविरुद्ध सरकारच्या धोरणाची री ओढली असेल. यातील नेमकी कोणती कामगिरी ते करीत होते हे प्रकाशात आले तर बरे होईल. अशा चुकीच्या धोरणाची अंमलबजावणी करायला ते परराष्ट्र खात्यात इतके दिवस का राहिले? आधीच राजीनामा देऊन मोकळे का झाले नाहीत? किंवा पाकिस्तानातच जाऊन पाकिस्तानच्या योग्य धोरणाची अंमलबजावणी करण्याची संधी त्यांनी का शोधली नाही? असे अनेक प्रश्न येथे उपस्थित होतात. श्री. सुगत दासगुप्ता यांचा जीना हे धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी, तसेच समाजवादी असल्याचा शोध लावल्याचा एक लेख १० सप्टेंबर १९७२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. हा लेख वाचून श्री. दासगुप्ता यांच्या कल्पनाशक्तीचे आपण कौतुक केले पाहिजे. जीना धर्मनिरपेक्ष होते याचा त्यांनी एकमेव पुरावा सादर केला तो म्हणजे जीनांची काही कागदपत्रे सापडत नाहीत हा आहे. यावरून ज्याँ पॉल सार्च यांच्या 'नःसोव' या नाटकाची आठवण येते. हे नाटक रशियाचा नऊंसोव् नावाचा गृहमंत्री पळालेला आहे, तो पॅरिसला येतो आहे, या काल्पनिक वृत्ताभोवती गुंफलेले आहे. पॅरिसला एका अट्टल डाकूच्या मागे तेव्हा पोलिस लागलेले असतात. पोलिसांच्या जाचातून सुटण्यासाठी तो आपण नऊंसोव् असल्याचे सांगतो. साहजिकच रशियाच्या या माजी बलाढ्य गृहमंत्र्याची मुलाखत घेण्यासाठी अनेक वृत्तपत्रांचे संपादक त्याच्याकडे धाव घेतात. अशा एक प्रसंगी एक संपादक त्याला विचारतो, "What is the proof that you are Nacrosov?" तो उत्तरतो, "I do not have any proof. This is a conclusive proof

१५४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान