पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे असे म्हटल्याखेरीज राहवत नाही." मी म्हणालो, “होय. त्यांनी तर हिंदूंबरोबर दोन हात करण्याची अप्रत्यक्ष धमकीच दिली."
 "अप्रत्यक्ष?" सिन्हा उद्गारले, "ते प्रत्यक्षच सरळ शब्दांत उघडपणे हिंदूंना ठोकून काढण्याची भाषा करीत होते. त्यात अप्रत्यक्ष काहीच नव्हते."
 अलीगढच्या या नाट्यावर त्या रात्री अखेरचा पडदा पडला. एका प्राध्यापक मित्राच्या घरी आम्ही रात्री जेवण करीत असतां पंचवीस-तीस मुले रस्त्यावर जमा झाली. आम्हाला अलीगडला बोलावणाऱ्यांपैकी एक विद्यार्थी घाबऱ्या-घाबऱ्या आम्ही जेवण करीत होतो. तेथे आला आणि म्हणाला, “गजब हो गया। त्यांना 'ऑर्गनायझर' चे अंक सापडले! आता काय करायचे?"
 मी म्हणालो, “अंक सापडणे शक्यच नाही. माझे लेख 'ऑर्गनायझर'मध्ये प्रसिद्धच झालेले नाहीत. ते अंक घेऊन या. मला दाखवा कुठे आहेत ते." हा विद्यार्थी म्हणाला, "तुम्ही खाली या म्हणजे अंक दाखवतो असे ते म्हणतात." माझे प्राध्यापक मित्र यावर उसळून म्हणाले, “दलवाई खाली येणार नाहीत. त्यांना सांगा दलवाईंचे प्रसिद्ध झालेले लेख आधी मला दाखवा आणि मग त्यांना मी खाली घेऊन येतो. दलवाईंनी लेख लिहिलेले नाहीत याबद्दल मला शंका नाही. या मुलांना काहीतरी कुरापत काढून दलवाईंवर हल्ला करावयाचा आहे असे दिसते. त्या मुलांना जाऊन सांगा, दलवाई माझे पाहणे आहेत आणि माझ्या घरासमोर त्यांच्याविरुद्ध मी तुम्हाला हुल्लड घालू देणार नाही." परंतु त्या रात्री दोन वाजेपर्यंत ते विद्यार्थी खाली थांबले होते. आम्ही आत बसून राहिलो. अखेरीला चर्चेच्या संयोजक मुलांनी मला "आपण येथे थांबू नये, आम्ही आपले संरक्षण करू शकणार नाही" असे पांगितले. आणि मी निघून जावे, तरच चर्चा दुसरे दिवशी सुरळीत पार पडेल असे सुचविले. विद्यार्थी मित्रांच्या विनंतीला मान देऊन मी दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीला परतलो. श्री. सेन्हा आणि प्रा. रेगे मात्र चर्चा संपवून मग परतले.

 अलीगढमध्ये घडलेल्या या प्रकाराचा उल्लेख मी मुद्दामच येथे केला आहे. सुशिक्षित मुसलमानांचे अंतरंग समजून यावे हाच त्यामागील हेतू आहे. डॅनियल लतीफी हे आणखी असेच एक 'पुरोगामी' मुस्लिम आहेत. स्वत:ला ते कम्युनिस्ट म्हणवून घेतात. भारतातील . कम्युनिस्ट चळवळीने हिंदु-मुस्लिम प्रश्नापुरती नेहमी मुस्लिम जातीयवादाला पाठिंबा देणारी भूमिका धारण केली असल्यामुळे जातीयवादी मुसलमानांनादेखील कम्युनिस्ट बनणे सोपे झाले आहे. भारतीय कम्युनिस्ट चळवळीतील बहुतेक हिंदू निरीश्वरवादी आणि खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षवादी आहेत, तर बहुतेक कम्युनिस्ट मुसलमान धर्मवादी आणि जातीयवादी आहेत. डॅनियल लतीफी याला अपवाद कसे राहतील? फाळणीपूर्वी ते पंजाब मुस्लिम लीगचे चिटणीस होते. पंजाबात या काळात प्रचंड दंगली झाल्या आहेत आणि मुस्लिम लीगने उघड उघड दंगलींना उत्तेजन दिले आहे हे पाहता 'पुरोगामी' डॅनियल लतीफींनी या दंगली शमविण्यासाठी कोणते प्रयत्न केले ही माहिती बाहेर आल्यास उद्बोधक ठरेल. पंजाबचे विभाजन झाल्यानंतर हे सद्गृहस्थ पाकिस्तानी मुसलमानांचे नेतृत्व करायचे टाकून भारतात का राहिले, असा प्रश्न उपस्थित करणे अप्रस्तुत ठरणार नाही. शेवटी हिंदूंच्या जाचातून मुक्त

१५२/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान