पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/152

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी   :- तसे आपण सिद्ध केलेत तर अलीगढ विद्यापीठाच्या आवारात माझी समारंभपूर्वक गाढवावरून धिंड काढायला मी आपल्याला संमती देईन. आपण 'ऑर्गनायझर'चे अंक आणून ही गोष्ट सिद्ध करीपर्यंत या विषयावर चर्चा करणे आता व्यर्थ आहे. माझे मित्र सिन्हा यांनी आता जो प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे?

एक विद्यार्थी :- दलवाईंच्या विचारांना आमचा विरोध आहे. आम्हाला संघटित व्हायचे आहे. आम्ही संघटित व्हायला हिंदूंनी का विरोध करावा? आणि दलवाईंनी त्यांना का पाठिंबा द्यावा? दलवाई जनसंघाचे पाठीराखे आहेत असे आम्हाला वाटते.

मी    :- असे म्हणून आपण माझ्यावर अन्याय करीत आहात. मी जनसंघाचा सभासद नाही किंवा त्या पक्षाचा पाठीराखाही नाही. मी सतत सुसंगतपणे धर्मनिरपेक्षवादी भूमिका घेतलेली आहे आणि सर्व जातिजमातींच्या जातीयवादाला विरोध केला आहे. मी जनसंघाचा पाठीराखा असतो तर तसे उघड सांगितले असते. त्यासाठी आडपडदा ठेवण्याचे मला काहीही कारण नाही.

श्री. सिन्हा  :- परंतु दलवाईंना आपला विरोध का?

एक विद्यार्थी  :- उघडच आहे. आम्ही संघटित व्हायला ते विरोध करतात म्हणून!

प्रा. रेगे  :- मुसलमान संघटित कशाकरिता होऊ इच्छित आहेत?

एक विद्यार्थी  :- हिंदूंनी आम्ही संघटित व्हायला का विरोध करावा? ते बहुसंख्यांक आहेत. त्यांना आमच्यापासून भिण्याचे काय कारण आहे?

मी.   :- मी कारण सांगतो. ज्या कारणासाठी इस्रायलने संघटित आणि प्रबल व्हायला संख्येने अधिक असलेले अरब विरोध करतात त्याच कारणासाठी मुसलमानांनी संघटित व्हायला हिंदूंचा विरोध आहे.

प्रा. रेगे  :- परंतु मुसलमानांना संघटित कशासाठी व्हायचे याचे आपण उत्तर दिलेच नाही.

एक विद्यार्थी  :- आपल्याला कारण पाहिजे? मी सांगतो. ऐकाच. मुसलमान एकवटलेले आहेत, हिंदू विभागलेले आहेत. या परिस्थितीचा फायदा घेऊन आम्हाला कम्युनिस्टांच्या मदतीने हिंदूंना ठोकून काढायचे आहे. याकरिता आम्ही संघटित होण्याची जरुरी आहे.

 या विधानानंतर ही चर्चा जवळजवळ थांबली. लक्षात आले की, आपल्यापैकी एका विद्यार्थ्याने आपले राजकीय हेतू उघड व्यक्त करण्याची 'तांत्रिक' चूक केली. "चला, आता खूप उशीर झाला." असे म्हणून ते चालू लागले. प्रा. रेगे आणि श्री. सिन्हा यांना विलक्षण धक्का बसला आहे हे मला जाणवले. ते अस्वस्थ झालेले दिसले. तेथून आमच्या निवासस्थानी परतताना रेगे मला म्हणाले, "अलीगढ येथे सुशिक्षित, बुद्धिवादी मुसलमानांचा भरणा अधिक आहे. या मंडळींचे हेच विचार असतील तर भारतीय मुसलमानांचे भवितव्य निराशाजनक

भारतीय मुसलमान /१५१