पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

J (ja) इंग्रजी वर्णमालेतील दहावें अक्षर आणि सातवें व्यंजन.ह्याची अनेकवचनं J's, J's,j's, j' अशी लिहितात. इंग्लंडमध्ये सुमारे ख्रिस्ती सन सोळाशें तीसपर्यंत 'ज्' हा उच्चार दाखविण्याकरितां 'J' ह्या स्वतंत्र अक्षराची योजना झालेली नव्हती. पण वरील सनानंतर i ह्या अक्षराला एक वक्राकार शेपटी काढून झालेले 'J' हे नवीन अक्षर 'ज्' हा उच्चार दाखविण्यासाठी लेखक लोक वापरूं लागले. अर्थात खिस्ती सन सोळाशे तिसापूर्वी इंग्रजी वर्णमालेत 'J' हे अक्षरच नसल्यामुळे 'J' अक्षराने सुरू होणारे अव्वल इंग्रजी शब्द फारच थोडे आढळतात. वरील सनानंतर 'J' ह्या अक्षराची इंग्रजी वर्णमालेत जरी भर पडली होती, तरी सुद्धा बराच काळपर्यंत इंग्रजी कोशकार i आणि j ह्या अक्षरांनी सुरू होणारे शब्द एकाच ठिकाणी देत असत. ह्या 'J' अक्षराच्या मूळ उत्पत्तीचा इतिहास असा आहे की, हे अक्षर मूळ i ह्या अक्षरापासून उत्पन्न झाले आणि i ह्या अक्षराची उत्पत्ति, सेमिटिक yod या अक्षरापासून असल्यामुळे, yellow शब्दांत असलेल्या y चा 'य' हा उच्चार i या अक्षराला प्राप्त झाला होता, जसें;-maior, iactus. तसेंच ची मूळ उत्पत्ति सेमिटिक yod पासून जरी झाली होती तरी ती ग्रीक भाषेतील iota (आयोटा) ह्याच्या द्वारे असल्यामुळे i ह्याचे 'इ' व 'आयू' असे आणखी दोन स्वरोचार होऊ लागले; जसें,-ibidem, militis. अशा प्रकारें i चे दोन्ही उच्चार (स्वरात्मक व व्यंजनात्मक) बन्याच शतकां पर्यंत होत असत. पुढं काही काळाने i चा जो 'य्' असा वार होत होता, तो काही शब्दांत 'य' चे जागी 'ज्' असा होऊ लागला. 'य' चे ठिकाणीं 'ज' असा उच्चार होण्याची प्रवृत्ति आपल्या इकडील प्राच्य भाषांतही आढळून येते, जसे:-यजुर्वेद =जजुर्वेद, यज्ञ=जज्ञ, यजमान=जजमान, यात्रा=जत्रा, यति=जति. याप्रमाणे पूर्वी 'य्' होत असलेला i चा उच्चार ज्' असा लोक जेव्हां करूं लागले तेव्हां 'ज' चा उच्चार स्पष्टपणे व्यक्त करणा-या अक्षराची लोकांना जरूरी वाढू लागली. ह्याच वेळी म्हणजे इसवी सनाच्या चौदाशेपासून सत्राशें पर्यंत m, n, u सारख्या अक्षरांच्या फाट्यांत i हे अक्षर लोपून जाऊ नये म्हणून i ह्या अक्षराला वर किंवा खाली वक्राकार शेपटी काढन लेखक लोक निराळे वळण देत होते. अशा रीतीने i चे बदललेल्या स्वरूपाचे j अक्षर घेऊन त्याला प्रथम 'जी' नंतर 'जे' हे नांव देऊन 'J' ह्या अक्षराची इंग्रजी वर्णमालेत स्वतंत्र स्थापना झाली. अजूनही डाक्टर लोकांच्या चिकित्सापत्रकांत ( medical prescriptions) j या अक्षराचा उपयोग अंकाच्या शेवटील i अक्षराचे जागी करीत असतात, जसे:-vj=6; xij= 12.न्युरपत्तिशास्त्राच्या दृष्टीने j, i, Y आणि g, ह्या अक्षरांचा अति निकट संबंध आहे; जसें,-jot =iota, join =yoke, jest=gesture. 2 a curve or figure of the shape of the letter 'j' 'J' ह्या अक्षरासारखी आकृति किंवा वक्र. ३