पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Being, the chief Hebrreru name of the Deity जेहोव्हा m, सनातन व स्वयंभू परमेश्वर m. हिब्रू लोकांमध्ये परमेश्वराला किंवा परमात्म्याला 'जेहोवा ' हे नांव आहे. ह्याचे इंग्रजीमध्ये God किवा The Lord ह्या शब्दांनी भाषान्तर करितात.
june (je-jõūn') [ L. jejunus, abstaining from food, hungry. या शब्दाचा धात्वर्थ 'रिकाम्या पोटाचा, भुकेलेला, क्षुधार्त' असा आहे.] a. empty, void of interest, barren फुसका, पोकळ, निर्जीव, निरस, रसहीन, रसशून्य, बेचव, बेकस, भुकड, भुकिस्त, रुखा, रुक्ष, निकस. Jejunely adv. Jejuneness n. फुसकटपणा m, नीरसपणा m, रसशून्यता f, बेचवपणा m, निकसपणा m, &c.

junum (je-jõõ'num ) [L. jejunus, empty. ] n. anat. a part of the smaller intestine ( so called because generally found empty after death ) मध्यांत्र n, रिक्तांत्र n, लहान आंतड्याचा मधला भाग m, पक्वाशयाचा दुसरा भाग m, हा भाग प्रेतांमध्ये नेहमी रिकामा दिसतो. 
Jelly ( jel'i ) [ Anything congealed or frozen, Fr. gelee-L. gelare, to freeze. ] n. a soft, transparent, tremulous substance obtained from animal matter प्राण्याच्या शरीराच्या काही भागांपासून काढून गोठवलेला रस m: मांसरसपक्वान्न n. २ the juice of fruit boiled with sugar, (शर्करामिश्रित) फलरसपक्वान्न n. Jel'lied a. in the state of jelly जेलीसारखा गिलगिलीत, बिलबिलीत. Jelly-fish n. घटाकार श्लेष्ममय जलचर m. हे प्राणी मऊ आणि चिकट असतात. कांहीं, माणसाच्या हाताच्या मुठीसारखे, कांहीं सपाट, कांहीं गोलार्ध, कांहीं कांचेच्या हांडीसारखे, व काही छत्राकृति असे असतात. ज्याला आपण सामान्य भाषेत मासे ( fish ) असे म्हणतों ते हे नव्हत. यापैकी कांहीं समुद्रकांठच्या वाळूवर मरून पडतात, त्यास कोणी 'समुद्रफेण' किंवा 'समुद्रफेंस'असे म्हणतात. Cuttle नांवाच्या प्राण्याच्या पाठींत जी एक कवची सांपडते, तिलाही 'समुद्रफेण' असे म्हणतात.

N. B.-पेरू, लाल अंबाडी किंवा करट फळे (currant, )यांचा रस काढून तो साखरेबरोबर शिजवून गोठविला असतां जो एक घन पदार्थ बनतो त्याला fruit jelly म्हणतात. जनावरांचे स्नायू, हाडे, खूर, संधिबंधने ही पुष्कळ शिजवून जो चिकट व दाट पदार्थ होतो तो गोटविला असतां त्याचा meat jelly तयार होतो. ह्याचे पनीरासारखे अगर खरवसासारखे तुकडे पाडतां येतात. जेली हा पदार्थ आपण ज्याला 'पंचामृत' म्हणतो त्या वर्गात येत नाही. ह्याला 'पक्कान्न ' म्हणावें. jelly is not सरस.

Jennet ( jen'et) [Fr. genet Sp. ginete, a nag, orig. a horse-soldier. ] ( also spelt Gennet, Genet. ) n.a small Spanish horseस्पेन देशांतील जेनेट जातीचा  घोडाm, हा हिंदुस्थानांत आढळत नाही.

jenny ( jen'i ) [ From root of gin, a machine. ] n.a gin or machine for spinning (कापूस) पिंजण्याचे यंत्र, जेनी f, जिन n.
Jeopardy ( jep'ard-i) [ Fr jeu parti, lit. a divided