पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

K ( ka ) इंग्रजी वर्णमालेतील अकरावें अक्षर. हे एक कंटस्थानीय व्यंजन आहे. मूळ फिनिशन आणि सेमेटिक Kaph या अक्षरापासून, ग्रीक Kappa व ल्याटिन K यांचे द्वारा इंग्रजी 'के' अक्षराची आकृति व उच्चार आले आहेत. इंग्रजीप्रमाणेच ल्याटिन व ग्रीक भाषांत 'के' या अक्षराचा 'क' असा उच्चार होता. परंतु ल्याटिन भाषेच्या शुद्ध लेखनांत 'क' हा उच्चार दाखविण्याकरितां प्राचीन C अक्षराचा उपयोग करीत असत आणि ह्यामुळे अगदी थोडे शब्द खेरीज करून बहुधा 'K' हे अक्षर बराच काळ निरुपयोगी होऊन राहिले होते. आणि ग्रीक भाषेतील शब्द जेव्हां ल्याटिन भात येऊ लागले तेव्हां ग्रीक K च्या ऐवजी ल्याटिनमध्ये C हेच अक्षर वापरीत असत. पण पुढे जेव्हां C अक्षराचा उच्चार 'स्' असाही लोक करूं लागले, तेव्हां 'क्' उच्चारासाठी C हे अक्षर वापरण्याचा प्रघात बंद होऊन 'स' करितां C व 'कू' करितां K या अक्षरांचा उपयोग सार्वत्रिक रीतीने होऊ लागला. पुढे इंग्लंडांतील 'नार्मन कांकेस्ट' झाल्यानंतर नार्मन शुद्ध-लेखन पद्धतीचा इंग्रजी भाषेवर बराच परिणाम होऊन 'स' व 'क' ह्या उच्चारांबद्दल नियमबद्धता प्रचारांत आली आणि a, 0, u, 1 आणि ' ह्या अक्षरांच्या पूर्वी होणारा 'क्' उच्चार व्यक्त करण्यासाठी 'C' या अक्षराचा उपयोग करावा, व e, i, y आणि नंतर n ह्या अक्षरांच्या पूर्वी हा 'क्' उच्चार व्यक्त करण्यासाठी 'K' ह्या अक्षराचा उपयोग करावा असा प्रघात सुरू झाला. व्युत्पत्तिशास्त्राच्या दृष्टीने C, G, आणि H ह्या अक्षरांशी K अक्षराचा निकट संबंध आहे. एकावयवी बऱ्याच शब्दांत C चा 'क' उच्चार निश्चित करण्याकरितां C च्या पुढे आणखी K हे अक्षर जोडतात; जसे, crack, check, deck, &c. ह्या शब्दांची 'ed' प्रत्ययाने जी रूप होतात (जसे:-cracked, checked, decked, &c. ) ती रूपे झाल्यावर 'K' हे अक्षर जर त्या शब्दांत नसते तर ह्या शब्दांत असलेल्या C चा उच्चार 'सू' असा झाला असता. C च्या पुढे K घालून C चा उच्चार 'क्' निश्चित करण्यासाठी ल्याटिन भाषेत C ला K जोडीत असत. पण ही पद्धत हल्ली चालू नाही. 'कू' उच्चार व्यक्त करण्याकरितां C ह्या अक्षराची योजना बरीच वर्षे चालू असल्यामुळे K. अक्षराने प्रारंभ होणारे अस्सल इंग्रजी शब्द अगदी थोडे आहेत. परंतु गेल्या शंभर वर्षांत पौरस्त्य, आफ्रिकन, अमेरिकन, आस्ट्रेलिअन, ओशियानिक व इतर युरोपियन भाषांतून, प्राणि, वनस्पति, व्यापाराचे जिन्नस, त्या त्या देशांतील हुद्दे इत्यादिकांचे वाचक पुष्कळ शब्द इंग्रजी भाषेत सामील झाल्यामुळे 'कू' उच्चाराकरितां K ह्या अक्षराने सुरू होणा-या शब्दांची संख्या अलीकडील इंग्रजी भाषेत फार वाढली आहे. २ K ह्या अक्षराची अनेक वचनें I's, Ks, Pos, ks अशी लिहितात. ३ कोणत्याही श्रेढीतील अकराव्या स्थाना. चे दर्शक अक्षर. ४K है संज्ञाक्षर म्हणून वापरतात, जसे:-(Kalium ) K = Potassium. K. B = Knighi