पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/999

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

accuse तोहमत-आरोप ठेवणे. D. n. (obs.) अपमान m, अप्रतिष्टा f. Defama'tion n. calumny, aspersion अब्रू घेणे n. २ law. अब्रूनुकसानी f, बेअब्रू f, नाचक्की f, नालस्ती f, अपभाषण n. Defama'torily adv. Defama'tory a. निंदात्मक, अब्रूनुकसानीचा, नालस्तीचा. Defa'mer n. अब्रू घेणारा. Defa'ming a. N. B.-In modern usage written defamation bears the title of libel and oral defamation that of slander. (Web.) Default (de-fawlt') [M. E. defaute-O. Fr, defaute, defalte-Fr. defaut-Low L. defalta, from a verb meaning to be deficient; from L, de & fallere, to deceive, ] n. failure, omission, fault चूक f, कसूर f, अपराध m, दोष m, अंतर n, तफावत f, दुराचार m. २ fault, offence गुन्हा m, अपकृत्य n. ३ law. कसूर m, गफलत f, नेमलेल्या दिवशी कोर्टात गैरहजर राहणे n. [ JUDGMENT BY DEFAULT कोर्टात हजर न झाल्यामुळे किंवा आपले म्हणणे न कळविल्यामुळे एखाद्या विरुद्ध झालेल्या खटल्याचा निकाल m. एकतर्फी निकाल m. IN DEFAULT OF (च्या) अभावी, (च्यांत) अंतर पडलें तर. IN DEFAULT OF PAYMENT पैसे न भरल्यामुळे. To SUFFER A DEFAULT एकतर्फी निवाडा होऊ देणे.] D. v. i. to fail in duty, offend. (वादीने-साक्षीनं-पंचाने) कर्तव्यास चुकणे, अपराध m- गुन्हा m- चूक f. करणे. २ to fail in fulfilling a contract, agreement, or duty करार पुरा करण्यास चुकणे, वचन न पाळणे, (कामांत-चाकरीत-बोलीत) कसर करणे. ३ to fail to appear in court कोर्टात हजर राहण्यास चुकणे. ४ to let a case go by default (आपल्यावर) एकतर्फी निवाडा होऊ देणे. D.v. to perform or pay चूक f, कसूर f, करणे, न देणे, न भरणे. २ (law.) to enter a default against वादी हजर नाही असे लिहन ठेवणे. ३ (obs.) to omit, out of account सोडून देणे. Default'er n. (कामात-चाकरीत-बोलींत) कसर करणारा-तफावत करणारा, लाजीमदार. [D. IN ACCOUNTS हिशेबचोर m, तजकऱ्या m.] २ (हुकुमाप्रमाणे कोर्टात हजर न झालेला) गैरहजर मनुप्य m. ३ हिशोबचोर m, उचापत करणारा m. ४ (वर्गणी वगैरे) न देणारा, न भरणारा. Defeasance (de-fe'-zans) [O. Fr. defesant, defeisant pr. p of defaire, desfaire, to render void-Fr. des (dis) , apart & faire (L. facere ), to make. ] n. (obs.) a defeat, an overthrow हार f, पराजय m, पराभव m. २ a rendering null or void रद्द-बातल करणे n, नियमभंग m, व्यर्थ-रद्द करणे n. ३ (law.) ( (मुख्य दस्तऐवज) रद्द करणारी अट f. Defea'sanced a. Defea'sible a. रद्द करण्यास योग्य, लोपनीय. Defea'sibleness n. Deed of defeasance (E. law.) खत किवा दस्तऐवजाबद्दल जी एखादी अट पाळल्यास तो दस्तऐवज कायद्याने रद्द ठरविला जातो त्या अटीचा कागद. Defeat) [M. E. defaiten, to defeat; O. Fr. Desfait-desfaire. Lit. it means to undo, to