पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/997

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समजणे, जाणणे, गणणें, लेखण, धरणे. D. v. i. to estimate, to be of opinion, to suppose अंदाज करणे, मत असणे, वाटणे. D. n. मत n. Deem'ster, Demp'ster n. आईल ऑफ मॅन बेटांतील दोन न्यायाधिशांची नांवें. Deep ( dip) [ M. E. deep; A. S. deep. ] a. extending far below the surface, far to the bottom खोल, निन्न, ओंड (R.); as, "A D. sea." २ extending far back from the front or outer Part लांब, लांबचलांब; as, "A gallery ten seats deep." 3 low in situation, lying far below the general surface खोलगट, सखल; as, "A D. valley. ४ hard to comprehend, profound, intricate, mysterious, obscure कठीण, गहन, अगम्य, दुर्बोध, निगृढ, खोल, गूढ; as, "A D. subject." ५ of Penetrating intellect, sagacious, cunning कुशाग्रबुद्धीचा, तीक्ष्णबुद्धीचा, कारस्थानी, कावेबाज, धूर्त, पक्का, पोहोचेल, दूरदृष्टि, शहाणा, पोक्त, आंतल्या गांठीचा, लुच्चा, विशाल बुद्धीचा, अभिज्ञ, निष्णात, पुरा, थोर, जाडा; as, “D. clerks she dumbs.” (Shakes.) & thorough, complete, intense, heavy, heartfelt भरपूर, भारी, फारच, अत्यंत, पराकाष्ठेचा, अगदी, अतिशयित, पूर्ण, परिपूर्ण, मनापासूनचा, अंतःकरणपूर्वक, गाढ, गडद ; as, “D. darkness, D. respect, D. sleep, &c." ७ strongly coloured, dark, intense गर्द रंगाचा, पक्का, दाट, गर्द, भोर (in काळाभोर), similarly लालबुंद, हिरवागार, पिवळा धमक, &c. ८ of low tone, full-toned, grave खोल, गंभीर, खरजांतला(?), मंद्र(?). ९ muddly, boggy, sandy (said of roads) रेताड, चिखल असलेला, चिकचिकीत. D. n. ओंड-खोल पाणी n, समुद्र m, दर्या m. २ dead ऐन, भर (used as a prefix in com.); as, "D. of winter" ऐन-भर हिवाळा. D. ads. पूर्ण, फार खोल, अत्यंत. Deep-browed a. of high intellectual powers विशालबुद्धीचा. Deep-drawing a. ज्याला तरंगण्यास खोल पाणी लागते असें (तारूं). Deep'en v. t. खोलावणे, खोल करणे, जास्त खोल करणे, खोली वाढविणे, ओंड करणे. २ to make darker or more intense, to darken गर्द-दाट करणे, तीव्र करणे, उठुन दिसेल असा करणे, गहिरा करणे. ३ to make more poignant or affecting, to increase in degree अधिक तीव्र करणे, (च्यांत) भर घालणें-पाडणे. ४ गंभीर-खोल करणे. D. v.i. खोल-गहन-गंभीर, &c. होणे. Deep-laid a. फार खोल विचाराने केलेला. Deep'ly adv. खोल. २ पूर्णपणे. [ D. VERSED पारंगत. ] ३ अति. ४ गंभीरपणाने. ५ खोल विचाराने. Deep'most a. अतिशय खोल. Deep-mouthed a. खणखणीत व मोठ्या आवाजाचा. Deep'ness n. Depth n. खोली f, सखलपणा m, गांभीर्य n. [To GET OUT OFF ONE'S D. lit. fig. खोल पाण्यांत शिरणे. ] २ खोलपणा m, गूढता f, गूढभाव m. Deep-read a. बहुश्रुत, ज्याचें पुष्कळ वाचन झाले आहे असा. Deep-sea a. समुद्राच्या खोल भागासंबंधी. Deep-seated a. ठामपक्का बसलेला. Deep-toned a. खोल आवाजाचा, गंभीर,