पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/982

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चर्चा f- भांडण n. करणे. २ to strive for भांडणे. D. v. i (often used with on or upon) to contend in words, to dispute, to discuss वाकलह m- वाग्युद्ध n. करणे, तकरार f- वादविवाद m. करणे. २ to deliberate, to consider मनाशी निर्णय m. करणे, विचार m. करणे. Debat'able a. चर्चा वादविवाद करण्याजोगा, वाक्कलहार्ह. २ वादग्रस्त. [ D. LAND n. इंग्लंड व स्काटलंड यांच्या सीमेवरील जमिनीच्या एका पट्याला ही संज्ञा आहे.] Debate'-ful a. (obs.) वादग्रस्त. २ भांडखोर. Debate'ment n. (R.) विचार m, चर्चा f, वादविवाद m. Debat'er n. वादविवाद करणारा. Deba'tingly adv. Debauch (de-bawch') [O. Fr. desbaucher-Fr. debaucher to corrupt-Fr. des ( L. dis) & baucher to hew.] v.t. to seduce दुर्व्यसनांत-बदफैलीत बद कर्मीत घालणे, बिघडवणे. २ (a female) फुसलावणे, फितवणे, भ्रष्ट करणे, सन्मार्गापासून वळवणे, कुमार्गास आडमार्गास लावणे. ३ to seduce from allegiance फितविणे, फित्तवणी f. करणे, विथरविणे; as, "To D an army." D. n. खाण्यापिण्यांत अतिरेक m. २ मद्यपान. ३ बाहेरख्याली f, बदकर्म n. Debauched a. दुराचारी, दुराचरणी, भ्रष्टाचारी, व्यभिचारी, बदकर्मी, बदफैली. Debauch'edly adv. Debauch'edness n." बदफैलीपणा m. Debauchee n. बदफैली, बाहेरख्याली, चंगीभंगी, सोदा, व्यभिचारी. Debauch'er the भ्रष्ट करणारा, कुमार्गास लावणारा, फूस लावणारा. Debauch'ery n. बदफैली f, बदकर्मा f, बाहेरख्याल-ली f. २ excessive intemperance विषयासक्ति f. Debauch'ment n. बाहेरख्यालपणा m, बाहेरख्यालीपणा m. Debenture (de-bont'-ūr) [ L. debentur, they are due, third person pl. passive of debere, to owe L. debenture, is the first word of the receipt passed. ] n. कर्जरोखा m. (सार्वजनिक कर्जाच्या रोख्यांना Debenture असें म्हणतात), कबुलायतीची चिठी f, प्रतिज्ञापत्र n. २ draw-backs देशांत माल आणतेवेळी त्या मालावर दिलेली जकात तो माल बाहेर देशी पाठविला असतां मालकाला परत मिळण्याबद्दलचे हूकूमपत्र n, परतजकातपत्र n. ३ law. दस्तऐवज m. Debenture bond n. कर्जाचा व्याजू लेख m. Debent'-ured a. जकात परत मिळण्याचा हुकूम असलेला. Debilitate (de-bil'-i-tat) [ from p. p. of L. debilitare, to weaken-L. debilis, weak-de, away & bilis (SK. बल), strength.] v. t. impair the strength of, to weaken, to enfeeble दुर्बळ-दुबळा करणे, कमजोर-निशक्त करणे, शक्ति f- बळ n-जोर m. कमी करणे. g. of o. Debilita'tion. n.दुबळा-कमकुवत करणे n.debil'ity n. क्षीणता f, शक्तिक्षीणता f, कमजोरी f, कमकुवत f, निर्वीर्यता f. [D. OF THE HEART हृदयाची अशक्तता f.] N. B.--Distinguish between Debility, Infirmity, Imbecility. See Infirmity. Dabit ( deb'-it) [ L. debitum, what is due, debt, from debere, to owe. ] n. a debt कर्जाऊ दिलेली रक्कम f. २