पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/980

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ABROAD परदेशात मेलेल्या आप्ताची बातमी f, हुंडी (collog.) f. UNTIL D. आमरणांत. VIOLENT OR UNNATURAL D. अपमृत्यु m, अकालमृत्यु m, दुर्मरण n, अपवात m. VOLUNTARY D. आपण होऊन मरणें n, देहत्याग m, काम्यमरण n. WORSE THAN D. मृत्युपरीस दारुण. TO WAIT FOR OR WISH THE D. OF तिलांजली घेऊन उभा राहणे, (च्या) नांवाने पाणी सोडणे (obs.), (च्या) मरणाची वाट पाहणे. TO CHEAT OR CHIDE D. काम्वंचना करणे. To DIE A NATURAL D. स्वाभानिक रीतीने मरणे. TO DRAW UP IN D. हातपाय गुंडाळणे. To WORRY TO D. जीव नकोसा करणे, प्राण-जीव खाणे. To BE ON THE POINT OF D. मरायास टेंकणे, (गु) घुडणे (?), मरणाचे पंथास लागणे, कंठीं प्राण उरणे, घटकापळावर येणे. SOME CTHER EXPRESSIONS FOR 'TO BE ON THE POINT OF DEATH' ARE:- यमलोकाची वाट f. धरणे, पंथास OR मरणाचे पंथास लागणे, डफ(ब)घाईस येणे, (ची) नाडी आटपणे, काठी शिखरास लागणे, तंती प्राण करणे, पाणी देखील घोटूं नये असें म्हणणे, हातपाय गुंडाळणे, कंठाशी प्राण येणे, जीव खळवटणे, उत्तरपंथास लावणे, घुटमळणे, घुटमुळणे, घुटवळणे, नाकाशी सूत धरणे. To RE QUIVERING OR FLICHERING IN D. एकजीव येणे, एक जीव जाणे. g. of o., टिकटिक करून असणे. TO DRAW TOWARDS D. मृत्युगंधास लागणे. To HAVE ONE'S EYES FIXED IN D. डोळे थिजणे g.of o.] २ पूर्ण नाश m, लोप m. ३ manner of dying मरण n, मरणाचा प्रकार m; as, "Let me die the D. of the righteous." ४ the cause of the loss of life मृत्यूकारण n, मृत्युकारणगोष्ट f; as, "He caught his D. at the last county sessions." ५ personified destroyer of life मृत्यूदेव m, यमधर्म m, धर्मराज m, कृतांत m; as, "D. a great proprietor of all." ६ danger of death प्राणसंकट n, जीव जाण्याचे भय n, as, "In Deaths oft." ७ murder खून m, घात m, वध m. as, " Not to suffer a man of D. to live." ८ theol. loss of spiritual life आत्मविस्मृति f, मोह m, धर्मभ्रंश m. ९ anything so dreadful as to be like death मृत्यूप्रमाणे दारुण-भयंकर गोष्ट f; as, “It was D. to them to think of entertaining such doctrines." Death-adder n. दक्षिण आफ्रिकेतील भयंकर कांडर n- सर्प m. Death-agony n. प्राणांत यातना f. Death-bed n. मरणशय्या f. Death-bell n. मरणघंटा f, खिस्ती लोकांत एखाद्याच्या मरणासमयी वाजविलेली घंटा f. Death-blows n. घातक मार m, प्राणघातक आपात m-ठोसा m-गुद्दा m. Death-damp n. मरणसमयी येणारा घाम m. Death-duties n. मृताच्या वारसाने मिळकत ताब्यात घेतांना सरकारास दिलेला कर m, वारसपट्टी f, वारसकर m. Death-fire n. दलदलीच्या जमिनीत दिसणारा एक प्रकारचा ग्यासचा दिवा m. हा दिसला म्हणजे मृत्यु सनिध आहे असें भोळसर लोक मानतात, भुताटकी खेळ m, वेताळाची स्वारी-मशाल f. Death'ful, Death'ly a. नाशकारक,भयंकर, हानियुक्त. Death'less a. अमर, नाशरहित. Death'-like a. मरणासारखा. २ भयंकर. Death-liness n. घातकपणा m, भयंकरपणा m. Death-marked a. मरावयास-मरू