पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/955

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असे. त्यावरून त्यास लोक सिनिक म्हणजे श्वानवृत्ति असे म्हणू लागले व त्यावरूनच 'सिनिसिझम्' हा शब्द निघाला. त्या मताचे अनुयायी हे तत्कालीन इतर मतांचा फार द्वेष करीत असत व सामाजिक रीतीभातींचा त्यांस फार तिरस्कार वाटत असे. त्यांची वृत्ति बहुतकरून फार कडक व उदासीन असे. ह्यावरून सिनिक ह्मणजे गुरगुरणारा, दुरात्मा, निंदाशील, मनुष्यद्वेषी, उदासीन असे अर्थ आले आहेत. मनुष्य हा स्वभावतः स्वहितसाधू असून परोपकार हे केवळ ढोंग होय असे समजणारे मनुष्यासही सिनिक असें म्हणतात. Cynosurce (si-no-shūr or sin'o-zhur ) [L.-Gr. kunos. a dog & oura, a tail. ] n. ध्रुवपुच्छ m, ज्योतिरथ m. २ मोहनी f, आकर्षण n ,प्रलोभन n. ३ मार्गदर्शक, दर्शक. Cypher (si'fer ) Same as Cipher. Cypress (si’pres') [ L. cupressus, the Cyprus.] n. bot. सुरूचे झाड n, सरू m, सुरू. [ONE READY ALIKE TO BEAR C. OR MYRTLE शुभाशुभाला सारखा cr. fig. आंव्याचा डहाळा, आम्रपल्लव. TALL OR STRAIGHT CYPRESS. स(सु) रूचा, स(सु)रू दार.] Cyprus (si'-prus ) [From Cyprus, where it was first manufactured. ] n. सायप्रस नांवाचे काळे वस्त्र n. हे अशुभसूचक असते. Cypsela (sīp-se-la) [ Gr. kupsele, any hollow vessel.] n. bot. एकबीजफल n. Cyst (sist) [L. cystis-Gr. kustis, a bag.] n. (प्राण्याच्या शरीरांतील) रोगट द्रव्यांची पिशवी f, अर्बुद n, अवाळू , गळू n, सभोंवती पापुद्रा असून आंत पाणी आहे असे आवाळू, गांठ वगैरे. Cys'tic, Cys'tiform, Cys'toid a. पिशवीच्या आकाराची. Cys'ticle n. लहान