पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/952

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

CUT ACROSS नीट मधून जाणे. To CUT IN-INTO मध्येच शिरणे. To CUT UP चांगल्या किंवा वाईट (सरसकट) भागांत वाटणी करणे. २ खोड्या करणे. To CUT UP ROUGH कज्जेखोर होणे.] Cut a. कापलेला, कापीव, छिन्न-त्रुटित-निकृत. २ विभागलेला, भाग पाडलेला. ३ कोरलेला, कोरीव. ४ लायक. C. n. घाव m, घाय m, जखम f. २ (a) प्रहार m, वार m. (b) फटका m. ३ कठोरवचन n, मर्मभेदी-छमी वचन n, ४ अनादर m, हेळसांड f. ५ खोबण f, खांच f, खांड f. ६ कापून पडलेली-झालेली-खांच f. ७ तुकडा m, खंड m, भाग m. ८ कोरीव चित्र n. ९ पत्ते कापणे n, कापणी f, काटणी f. १० बेत m, तोंड n, मोड m, घाट m, डौल m, तन्हा f. ११ (obs.) खच्ची केलेला (घोडा) m. १२ सुताचें कुकडें n, (लोकरीची) लडी f. १३ जवळचा रस्ता m- वाट.f. १४ pl. दैव n, नशीब n. Cut'ting pr. p. Cut pa. p. Cut-away coat ज्याच कोपरे कापले आहेत असा (कोट) m. Cut off जवळचा रस्ता m. Cut-purse-pocket n. खिसेकापू, कातऱ्याचोर उचल्या m, भामटा m. Cut'ter n. कापणारा m, कपड बेतणारा m, शिंपी m. २ कापण्याचे हत्यार n- सुरा m. ३ एक प्रकारची होडी f. ४ एका घोड्याची लहान गाडी f. ५ रेव्हिन्यु कोटीतील एक अमलदार m. ६ गळा (ळे)- कापू m, खुनी m. ७ पिवडी f. [C. TIROAT n. मान-गळा कापणारा m. ] C. a. दुष्ट, घातकी. Cut'ting n. कापणे n, छेद m, छेदन n, काप m, काट m, कापणी f. &c. २ कापलेला पदार्थ m, काप m, कपळा m, तुकडा m, चकता f.३ वर्तमानपत्रांतील संग्रहासाठी कापलेला परिच्छेद m, (परॅग्राफ m). ४ डोंगर पोखरून केलेला रस्ता m, बोगदा m. C. a. तीक्ष्ण, तीव्र. २ मर्मी, मर्मच्छिद, मर्मभेदक, तिखट, जिव्हाळी लागणारा. A cut above किंचित् जास्त, वरची पायरी f, कांकणभर सरस. Cut-nail n. लोखंडाचा पत्रा यंत्राने वळवून केलेला खिळा m. Cut-stone n. छिनीने-टाकीने घडलेला दगड m. Cut-water n. जहाजाच्या नाळीचा पुढील भाग m. (ह्याचे योगाने पाणी तोडले जाते.) २ पुलाच्या दगडी खांबाचा दगडी त्रिकोणी भाग m. ३ पाणकोंबडी f. Cutter-block n. mech. eng. कापण्याचा ठोकळा m. Cutting power a. कापण्याचे वळ n. Milling cutter n. एका प्रकारची धातू साफ करण्याची कानस f. Short-near cut जवळचा रस्ता. Cut and come again, take a cut from the joint and come for another if you like मांसाचा लहान तुकडा घ्या आणि लागल्यास पुन्हा या. Cut and dry or cut and dried तयार करून ठेवलेलें, तयार (the allusion is to timber cut, dry and fit for use). Cut off with a shilling अल्पांश देऊन वारसाचा हक्क तोडणे. Cut one direct ओळखीच्या मनुष्याकडे समक्ष पाहून त्यास ओळखिलें नाहीं असे दाखविणे. To cut indirect दुसरीकडे पाहून त्याला पाहिलेच नाही असे दाखविणे. To cut the ground from under one प्रतिपक्ष्याच्या सर्व मतांचे खंडन करणे. Cut one's coat according to one's cloth आंथरूण पाहून पाय पसरणे, आदा पाहून खर्च करणे.