पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/951

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाग करणे. २ छेदणे, कातरणे, कापणी करणे. ३ कापणे, छाटणे,कातरणे; as, "To cut the hair." ४ कोरणे,खोदणे, तोडणे. ५ () मर्म-हृदय भेदणे, (चा) मनोभंग करणे, (ला) झोंबणे, लागणे. ६ छेदणे. ७ खच्ची करणे, अंडच्छेद करणे. ८ ओळख बुजवणे,(ला) ओळख न देणे, (च्या-विषयी) (ला) अज्ञान दाखविणे, न पाहिलेंसें करणें, न जाणणे; as, "To cut one's acquaintance (colloq.)," गैर हजर राहणे. १० माकडचेष्टा करणे,खोडी-चेष्टा करणे;as, "To cut a caper," आनंदाने नाचणे- बागडणे, खिदळणें-खोडी करणे. [To C. THE CARDS (गंजिफांतील-पत्यांतील पानं वांटण्यापूर्वी) डाव काटणे. To CUT A DASH OR FIGURE (colloq.) प्रभाव दाखविणे, गाजवणे, नांव n- कीर्ति मिळवणे. To CUT DOWN जमीनदोस्त करणे, चीत करणे, पाडाव करणे. २ तोडून पाडणे, खंडन करणे, चीत करणे; As, "SO GREAT IS HIS ELOQUENCE THAT HE CUTS DOWN THE FINEST ORATOR." ३ कापणे, छाटणे,कमी-न्यून करणे; AS, "To CUT DOWN THE EXPENSES." ४ naut. हलक्या वर्गात दाखल करणे; As, "To CUT DOWN A FRIGATE INTO A SLOOP." TO CUT A JOKE थट्टा करणे. TO CUT THE KNOT OR THE GORDIAN KNOT संक्षिप्त रीतीने अडचण दूर करणे, दांडगाईनें-झटकाफटकी संकट दूर करणे, संकटांतून पार पडणे. To CUT LOTS पत्त्याचे भाग पाडणे, विभाग-वांटा करणे. To CUT OFF कापणे, कापून काढणे. २ नाश करणे, उच्छेद करणे, अंत करणे, उत्कर्तन- अवकर्तन करणे. ३ चा संबध-व्यवहार-संसर्ग बंद करणे-बंद पाडणे. ४ थांबविणे, हरकत करणे, मोडा घालणे; As, "To CUT OFF AN ENEMY'S RETREAT." ५ समाप्त करणे, अंत करणे, योग्य वेळापूर्वी संपविणे. To CUT OUT कापून काढणे, कापणे; AS, TO CUT OUT A PIECE FROM A BOARD.” २ बेतणे, बेतून कापणे- काढणे, आंखून कापणे, बेतणी करणे; As, "To CUP OUT GARMENTS." ३ योजणे, योजना करणे, (च्या) साठी तयारी करणे. ४ युक्तीने जागा हिसकावून घेणे. ५ अटकावणे, प्रतिबंध करणे, रोखणे. ६ बंदरांतून शत्रूच्या तोफांच्या माऱ्यातून जहाज पकडून नेणे. To CUT TO PIECES कापून तुकडे तुकडे करणे, चूर करणे. २ कत्तल करणे, कापणे. To CUT A PLAY नाटकांतील काही भागाची छाटाछाट करून त्याचे लहान नाटक करणे, नाटकाची रंगावृत्ति करणे. To CUT RATES दर कमी करणे. To CUT SHORT थोडक्यांत आणणे, संक्षिप्त करणे,आंखूड-लहान करणे, एकदम बंद करणे, अटकावणे. To OUT STICK (slang.) पळून जाऊन नाहीसे होणे, पलायन करून जाणे. To CUT TEETH दांत येणे-फुटणे, दंतोद्गम होणे. TO HAVE CUT ONE'S EYETEETH (colloq.) हुशार-तल्लख होणे. To CUT ONE'S WISDOM TEETH समजू लागणे, समजण्याच्या घरांत येणे, अक्कलदाढा येणे. To CUT UNDER कमी भावानें- किंमतीने विकणे. To CUT UP तुकडे तुकडे करणे, कापणे. २ उच्छेद करणे, उच्छेदणे, नाश करणे. ३ पीडा करणे, धैर्य खचविणे, इतधैर्य करणे, खिन्न करणे]. Cut v.i.कापणे; as, "This knife cuts well." २ कापले जाणे.३ नेवट-नेऊर-लागणे (as a horse). ४ पलायन करणे, पळ काढणे. ५ हुकुमाकरिता पत्ते काटणे. ६ चाबकानें आवाज करणे, (चाबूक) काडकन वाजविणे, होईल तितक्या घाईने निघून जाणे, नांगराचें दोरखंड कापून गलबत घेऊन पळणे, दांत फुटणे. [To