पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/938

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

loudly तकरार करणे. To C. AGAINST to protest against (चा) निषेध करणे. To C. TO OR UPTO to call on in prayer, to implore (चें) आर्जव-विनंति करणे, (ची) करुणा भाकणे, सहाय-मदत मागणे. To C. OUT AGAINST to blame, to utter censure दोष देणे, चूक काढणें निंदणे.] २ to cutter a loud voice in weeping, to weep, to lament रुदन करणे, शोक करणे, रडणे, रुदंती करणे, (with a loud voice) आकांतणे, आकांत-आक्रोश करणे. [To CRY WITH PLENTIFUL TEARS ढळढळां रडणे. To C. UNGOVERNABLY ओक्साबोक्सा रडणे. To C. UNCEASINGLY रडण्याचा चळ घेणे, रडण्याचा टाहो घेणे, रड घेणे. To C. SOBBINGLY मुसमुसणे, हुमसणे, स्फुदणे.] ३ to utter a loud sound in distress आक्रोश करणे. ४ to proclaim जाहीर करणे, पुकारा करणे, प्रसिद्ध करणे. ५ fig. ( in contempt ) रर करणे, पागोळ्या सोडणे, गाई पाण्यावर आणणे. ६ (esp. applied to babes and infants ) केंकटणे, कोकलणे, केंकणे, केकटणे, टेटावणे, ट्यांहाट्यांहा करणे. [ THE FOLLOWING WORDS GIVEN BY MR. CANDY IN SENSE NO 6 ARE OF VERY RARE USE. केंकावणे, खेकाटणे, किरकणे, पिरंगणे, कण्हेरी गाणे, टांही OR तांही भरणे.] ७ (of animals generally ओरडणे, आरडणे, पुकारणे (?), शब्द करणे. ८ (of a bird ) किलबिलणे, किलकिलाट करणे. ९ (of an elephant) ची ची करणे. 10 (of a crane) किचकिचणे, कचकचणे. ११ (of a peacock ) टाहो फोडणे. १२ (of the bandikote) रोरावणे, रोराण n- करणे. C.v.t. मोठ्याने ओरडणे. २ रडूनरडून अमुक एक गोष्ट करायला लावणे; as, "To C. one's self to sleep." ३ to proclaim, to name loudly and publicly for giving notice पुकारा करणे, जाहीरखबर देणें, दवंडी पिटवणे. ४ जाहीर करणे. [To CRY UP to praise, to applaud, to extol वाडवार-बढाई-बढाईकी-तारीफ-थोरवी प्रतिष्ठा-फुशारकी- &c. सांगणे, वाखाणणी-स्तुति करणे, वाखाणणे, तारीफ करणे. २ किंमत वाढविणे: TO CRY DOWN to decry by words or writing, to depreciate उणेपणा-उणावकी-उणीव-लहानवी-अप्रतिष्ठा-&c.करणें-सांगणे, (चें) वजन-किंमत कमी करणे, निंदणें.] C.n. pl. Cries. ओरड f, ओरडाओरड f, गोंगाट m. २ विलाप m, आक्रंद n, रुदन n, रोदन n. ३ पुकारा m, पुकार m, साद f. ४ आरोळी f . ५ हर्षनाद m, हर्षगर्जना f. ६ (ओरडून केलेली) नम्र विनंति f; as, "C. the most piteous cry of the poor souls.” ७ दंवडी f. ८ लोकवाणी f, लोकवार्ता f; as, "The cry goes that you shall marry her.” ९ शिकारी कुत्र्यांच्या टोळी f; as, "The cry more tunable was never holloaed to nor cheered with horn." १० (in contempt) चौकडी f; as, "Would not this get me a fellowship in a cry of players." Cried pa. p. Crier n. रडणारा. २ ओरडणारा, थाळीदौंडी पिटणारा. ३ कोर्टीत पुकारणारा. Crying a. लक्ष्य देण्याजोगा, भयंकर, &c. Crying n. ओरडणे n, ओरड f, ओरडा m. २ धांवा m, हांक f, धांवणे n. A far cry फार अंतर, लांब अंतर. Great cry and little wool m.