पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/935

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीची वनस्पति f, मोहरीकुल. Cruc'ifer n. क्रूसवाहक m, एखाद्या समारंभांत क्रूस घेऊन चालणारा, एखाद्या समारंभांतील क्रूसवाला m. Crucif'erous a. क्रूसासारखी पाकळ्या किंवा पाने जिला असतात अशी (वनस्पति ). २ क्रूस धारण करणारा, क्रूसधारी. Crucify (kru'-si-fi) [L. crux & figere, fixus, to fix.] v. t. कूसावर चढवून ठार करणे, क्रूसावर चढविणे-देणे,हातापायांत खिळे ठोकून क्रूसावर खिळवणे. २ अतिशय यातना देणे. ३ जिंकणे, दमन करणे. Cru'cified pa. p. Cru'cifier n. क्रूसावर चढविणारा. २ छळ करणारा, त्रास देणारा. Cru'cifix n. क्रूसावर लावलेले ख्रिस्ताचे चित्र n. The crucifixion n. क्रूसावर चढविणे-देणे &c. Cru'ciform a. क्रुसच्या आकाराचा. Crucig'erous a. क्रूसाची खूण असलेला. Crude (krud) [L. crudes, rav.] a. कच्चा, आम, अपक्क, कोवळा. २ हिरवा, कच्चा. ३ अप्रौढ. ४ आम, अजीर्ण. Crude'ly adv. Crude'ness, Crud'ity n. कच्चेपणा m, अपक्कता f, अप्रौढता f.२ कच्चाई f, अपक्वत्व n. ४ med. आम f. Pop. आंव f, आमांश m, कुपित्थ (?) n. Cruel (krū’-el) [Fr. crucl.-L. crudelis, cruel. ] a. क्रूर, निष्ठुर, कठोर, दयाशून्य, निर्दय, उग्र, निष्करुण, खुनी, खाटकी, घातकी, अमानुप, राक्षसी, हिंसक, हिंस्र. २ दुःखदायक, परपीडक, परदुःखसंतोषी, दुःख देण्याच्या स्वभावाचा. ३ दुःखकर, कठोर. Cruel-hearted a. निष्ठुर अंतःकरणाचा. Cru'elly adv. Cru'elty n. निर्दयपणा m, निष्ठुरपणा m, &c. २ a cruel deed क्रूरकर्म. Cruet (krū'-et) [A. Fr. cruet-O. Fr. cruie-L. cruga,a pitcher.] n. सिर्कादाणी f, कांचेची लहान कुपी f. Cruet-stand n. घड m. (कुप्या ठेवण्याचा). Cruise ( krūz) [Dut. kruisen, to cross the sea, kruis, a cross-L. Crux.] v.t . रक्षणाकरितां किंवा लुटीकरितां समुद्रांत तारवें घेऊन खेपा करणें, दर्या फिरणे, समुद्रांत फिरणे, समुद्रपर्यटन करणे. C. n. दर्या फिरणे n, समुद्रपर्यटन n. Cruis'er n. समुद्रपर्यटन करणाऱ्या माणसाचे वाहन n, शत्रूची गलबतें धरण्याकरितां व आपले देशाच्या गलबतांचे रक्षण करण्याकरितां समुद्रांत फिरणारे लढाऊ गलबत n, क्रूझर n. Crumb, Crum (krum) [A. S. cruma, a crumb cf. Ger. krume.] n. चुरा m, कुसकुर m, कुटका m, कण m. २ (as opposed to crust ) भाकरीच्या-पावाच्या आतील मऊ खुसखुशीत भाग m, गर m, गीर m, गर्भ m, मगज m. ३ लेश m, अल्पांश m; as, "A crumb of comfort.' C. v.t . चुरा करणे, भूस करणे. Crumb'y, Crum'my a. चुरा झालेला, भुसभुशीत, खुसखुशीत, पिठूळ. Crumble ( krum-bl ) [ See Crumb.] v. t. कुसकरणे चुरणे, चुर-चुरा-चुराडा- भगरा करणे g. of o., चुरडणे. C