पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/922

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Crawfish, Crayfish ( kraw'-fish, krā'-fish) (See Crab.] n. नदीतला खेंकडा m, चिमोरा m, चिमोरें. pl. Crawfishes. Crawl (krawl) [ Dan, kravle, or Icel. krafle, to paw, to scrabble with the hands.] v. i. to creep सरपटणे, सरपटत चालणे-जाणे, खुरडत जाणे. २ रडत-खडत-रर-करीत-रखडत-झरतमरत-मुरूमुरू- फेंदत-लंघत अडखळत जाणे-चालणे-फिरणें, खुरडत चालणे, पोटावें घसरत जाणे; as, "A worm C.s on the earth; a boy C.s up a tree." ३ (a child ) घोडा-(घोडूला) करणे, रांगणे. ४ to move secretly and slily लपून-छपून-चोरून-चोरगस्तीने-मुंगीच्या पायाने चालणे जाणे-येणे. ५ हळुहळू दाखल होणे, आंत शिरकाव करणे. ६ अंगावर मुंग्या किडे फिरल्यासारखे वाटणे; as, "The flesh C.s." C. n. रखडत जाणे n, रांगणे n. Crawl'er n. रखडत जाणारा. Crawl'ing n. रांगणें n, सरपटत चालणे n-पोटाने सरकणे n, उरोगमन n. Crawl'ing pr. a. रांगणारा, सरपटणारा, उरोगामी, सरपटत चालणारा. Crawl'ingly adv. सरपटत, भुईसरपटत-टां. Crawl'y a. Crawl (krawl) n. समुद्राचे कांठी मासे ठेवण्याकरितां केलेला वाडा m. Crayon (krāʻ-un) [Fr. a lead pencil, from crae, chalk.] n. खडूची कांडी f, रंगीत मातीची कांडी f. २ खडूच्या कांडीने काढलेले चित्र n. ३ चित्रकलेत रंगा, साठी लागणारे पदार्थ. C. v. t. खडूच्या कांडीने चित्र काढणे. Craze ( krāz) [O. E. crasen, to break.] v. t. to crush, to grind to powder' तुकडे-पीठ करणे, फोडणे. २ (obs.) to weaken जर्जर करणे. ३ to derange the intellect of वेड भरविणे, वेडगळ &c. करणे; as, "Grief hath C.ed my wits." Shakes. C. v. i. पिसा-वेडा होणे. C. n. उन्माद m, चित्तभ्रम m. Crazed, Craz'y a. जर्जरचिंधड्या झालेला, जीर्ण; as, " Piles of mean and C. houses." २ crack-brained, mad वेडगळ, वेडसर, वेडपा, वेडका-वायचळलेला or वायकळलेला, or वावकळलेला, मंत्रचळ्या, विक्षिप्त, पिसाट, खुळा, भ्रमिष्ट, वेडा, पिसा. [To TURN OR BECOME C. चळणे, वायचळणे, वायकळणें or वावकळणे, बावचळणे, आवगणे, खुळावणे, ESP. FROM DEMONIAC INFLUENCE, PASSION, &c. पिसाळणे, पिसटणें-पिसाटणे.] ३ weak अशक्त, निर्जीव. ४ shaky, unsafe ; as, "One of great riches, but of C. constitution." ५ demented, deranged उन्मत्त, भ्रांतचित्त. ६ foolishly eager अतिआतुर-उत्कंठित, भरी भरलेला; as, " The girls were C. to be introduced to him.” Craz'ily adv. Craz'edness, Craz'iness n. वेडगळपणा m, पिसें n, चळ m, वायचळ m, बावचळ m. खूळ n, वेड n. २ जर्जरपणा m, जीर्णता f. Crazing mill n. खाणीतील जस्ताची माती कुटण्याची चक्की f. Creak ( krēk) [ Fr. Imitative like crake & croak. ] v. i. to make a sharp. noise करकरणे, किरकिरणें, खिरखिरणे, घिरघिरणे, करकर वाजणे. C. v.t. करकर वाज