पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/901

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



C. v. t. उत्तेजन देणे, कैवार घेणे, सहाय करणे, पाठ राखणे, पसंती-आधार-आश्रय पाठिंबा-मान्यता देणे. Coun'tenancer n. उत्तेजन देणारा, कैवार घेणारा, मदत करणारा. [ A WEEPING COUNTENANCE; रडकें-रडवें-रडतें तोंड, रडतो सुरत, रोती सुरत. To CHANGE C. तोंडावरील चयेंन बदल करणे. CHANGE OF C. मुखवैवण्य n. FRESHNESS AND LIVELINESS OF C. टवटवा, टकटकी, नवती, तजेला, लुकलुकी, मुखश्री, टवटवीतपणा. HIS C. FELL तो रागावला-खिन्न झाला. IN C. बेधडक, शरम-भीति न धरितां, धीटपणानें. धिटाईने ( OPPOSED TO OUT OF C.) TO KEEP OR TO PUT IN C. वर मान धरतां येईसें करणें, धीटपणा देणे. TO KEEP ONE'S C. मनोवृत्तांचे फरक चेहऱ्यावर दिसू न देणे. २ हंसें न आवरणे. TO LET THE C. FALL तोंड-मुद्रा उतरणें, चेहरा पडणे. To PUT OUT OF C. मान खाली घालावयास लावणे, फजीती उडविणे, लाजविणे, खाली पहावयास लावणे, गोंधळांत पाडणे. OUT OF C. भीतीने गोंधळून टाकलेला, लज्जा विनम्र. To LEND C. TO उत्तेजन देणे. I COULD NOT KEEP MY C. हासल्यावांचून किंवा चेहऱ्यावर मनोवृत्ति प्रदर्शित केल्यावांचून राहवेना. IT WAS AS MUCH AS I COULD DO TO KEEP MY C. हसें आवरतां आवरतां मला पुरेसें झालें. Counter (koun'-ter) [Fr. contre, from L. contra, against.] adv. contrary, in opposition (used chiefly with run or go) विरुद्ध दिशेने, उलटा, प्रतिकूल. २ Contrary to the right course कुमार्गाने, खोट्या-आड रस्त्याने; as, " A hound that runs counter.” ३ ताेंडासमोर, आंगावर. C. a. contrary, opposite उलटा, विरुद्ध; as, "A counter agent, counter principles. " C.n. (of a horse ) घोड्याची मान व खांदा यांमधील शराराचा भाग किंवा छाती f. २ naut. नाळ आणि जलमर्यादा यांमधील नावेचा बांकदार भाग m. ३ बुटाची खाेंट f. ४ (obs.) गांठ f, भेट f, मुलाखत f. C.v.i. (दुसरा गुच्चा मारीत असतांना त्याला) उलट गुच्चा-ठोंसा-मारणे. Counter ( koun'-ter) n. See Count (v.) Counter (koun -ter) [ A Latin prefix meaning contrary, opposite &c. as Counteract, Counterbalance.] Counteract (kown'-ter-akt') v. t. उलट प्रयत्न-व्यापार(S.) करणे-चालवणे, प्रतिकार-प्रतिक्रिया-प्रतियोग-प्रत्युपाय करणे, उलटविणे, मोडणे, खंडणे, पाडणे. Coun'teractor, Coun'teracting n. 'उलट प्रयत्न करणारा, कार्यहंता, प्रतियाेगी (S.), प्रतिकारकर्ता, प्रतिकारकारी, प्रतिकारक. Coun'teraction n. उलट प्रयत्न करणे n- चालवणे n, उलट प्रयत्न m- व्यापार m, प्रतिकार m, प्रतिक्रिया f, कार्यहनन n. Coun'terac'tive a उलट प्रयत्नाचा. प्रतिरोधी, रोधणारा. अटकावणारा, अडथळा करणारा. C.n. See Counteractor. Coun'terac'tively adv. Counter-agent n. प्रतिकारक वस्तु f. Counter-approach n. वेढा घालणारा, शत्रू जवळ येऊ नये म्हणून वेढा घातलेल्या जागेभोवतालची केलेली तटबंदी f. Counter-attraction n. विरुद्धाकर्षण n. Counter-balance v. t. तोलणे. तोलून धरणे, बराबर-समभार.