पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/900

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दरकार राखणे, गणना-परवा-करणे. C. n. गणना f- गणती f- करणे n, गणना f, गणती f, मोजलेली संख्या f. २ Law तोहमतीतील सदर n. ३ कोडतांत वादीची तकरार जाहीर करणे n, दावा m- फिर्यादीची प्रत्येक बाब f, रकम f, अभियोग (S.) m. Countable a. मोजण्याजोगा, गण्य, गणनीय, &c. Counted a. गणलेला, मोजलेला, &c. Count'er n गणना करणारा. २ दुकानदाराचे पैसे मोजण्याचें टेबल n.-फळी f. ३ खेळाचा डाव मांडताना वापरलेली धातूची चकती f. ४ इंग्लंडांतील एका बंदी खान्याचें नांव n. Counting-house,-room n. व्यापाऱ्याची हिशेब करण्याची जागा f, हिशेबघर n, व्यापाऱ्याच्या कारभाऱ्याचें घर n, पेढी f. Count'less a. असंख्य, अगणित. Count-wheel n तास वाजविणारे दात्यांचे चक्र n, (घड्याळांतील) कालगणक चक्र n, कालवादक चक्र n, (घड्याळांतील) तासाचे चक्र n, तासचक्र n. To count chickens ere ( before) they are ha See Chicken. To count out (special phrase House of Commons) कायद्याने कमीत कमी हवे तितके (चाळीस) सभासद नसल्यामुळे सभा बरखास्त करणे; as, “He had not proceeded far in his address when the House was counted out." २ एखाद्याला मोजण्यांत-जमेस न धरणे, (वर) मदार-भिस्त न ठेवणे. Count ( kount) [ Fr. comte,-L. comes, comitis, an associate, a companion, one of the imperial court or train. itum Supine of ire, to go. of. Sk. इ.' to go] n. युरोपखंडांत आमिराचा एक किताब m. हा इंग्लंडंतील अर्ल बरोबर आहे. Coun'tess n. fem. (of Earl) अर्लाची किंवा काउंटची बायको f. Count'ship n काउंटची पदवी f-मानमान्यता f. २ काउंटच्या अमलांतील m. Coun'ty n. प्रान्त m, देशविभाग.२ (obs.) काउंट अथवा अर्लच्या ताब्यांतील मुलूख m. ३ (obs.) अर्ल m, काउंटची m, County corporate n. काउंटचे हक्क ज्यास आहे शहर n. County-court n. काउंटीच्या हद्दीत इनसाफ करण्याचा ज्याला अधिकार आहे असें कोर्ट n. County-family n. प्रांतांतील सरदाराचें घराणे n. county-palatine n विशेष हक्क असलेला परगणा m. ह्या परगण्यांतील जहागीरदारांस पूर्वी राजासारखे हक्क असत. County-people n. चांगल्या सरदारी घराण्यांतील-वरंदाज लोक. County-seat n. परगण्यांतील मुख्य शहर n. County-town n. कसबा, ज्या शहरांत परगण्यासंबंधाने सर्व व्यवहार चालतात ते शहर n. Countenance (koun'-te-nans) [O. Fr. contenance, demeanour from L. continentia, continence from L. continere, to hold together, to repress. ] n. appearance or expression of the face, look, mien नूर m, मुद्रा f, चेहरा m, चर्या f, सुरत f. आकार m, ढब f. २ the face, the features मुख n. तोंडवळण n, तोंडवळा m, चेहरा m, मोहरा m, रूप m. ३ favour, moral support, encouragement कृपादृष्टि f, मान्यतादर्शक किंवा उत्साहदर्शक मुद्रा f, पाठिंबा m, पुष्टि (S.) f, आश्रय m, आधार m, हुरुप f, उत्साह m.