पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/899

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(R.), अभिप्राय m, मत n. २ prudence पोक्तविचार m. ३ advice, instruction उपदेश m, सल्ला m, अभिप्राय m, मत n. ४ deliberate purpose, or plan उपाय m, युक्ति f, योजना f, तजवीज f, मसलत f, बेत m, तोड.f; as, " The C. of the Lord standeth for ever.” The C.s of the wicked are deceit.” ५ a secret opinion or purpose कारस्थान n, गुप्त विचार m, काट (R.) m, कूट n. ६ one who gives advice esp. in legal matters कायद्याची सल्ला देणारा &c., वकील m, अॅडव्होकेट, बारिस्टर, सल्लामसलत देणारा (अनेकवचनींही counsel असाच शब्द योजतात). C. v. t. सल्लामसलत-आभिप्राय देणे, सुबुद्धि-सुविचार-अक्कल सांगणे. Coun'selling pr. p. Coun'selled pa. p. Counsel-keeper n. (Shakes.) बेत गुप्त ठेवणारा m. C. keeping a. (Shakes.)बेत-मसलत गुप्त ठेवणारा. Coun'sellable a. (obs.) दुसऱ्याची मसलत घेणारा-ऐकणारा-घेण्यासारखा. Coun'selled a. उपदिष्ट, मंत्रित, ज्यास सल्ला दिला आहे तो. Coun'selling n. मंत्र-सल्ला-मसलत देणे-सांगणे n. Coun'sellor n. सल्लामसलत देणारा, मसलतगार. २ (of a ruler or King) मंत्री m, अमात्य m, सचिव m. ३ (उपदेश करण्याची किंवा सल्ला देण्याची पात्रता असलेला) वकील m, 'बालिष्टर' m. Coun'sellorship n. सल्ला-मसलत देणे n, सल्लागारी f. २ सल्ला-मसलत देणाऱ्याचा हुद्दा m- पदवी f, साचिव्य n, मंत्रिपद n. Counsel of perfection a declaration of Jesus Christ not absolutely imperative but commended as the means of greater perfection (तारणाला) आवश्यक नव्हे परंतु केली तर अधिक श्रेयस्कर अशी गोष्ट. To keep counsel बेत गुप्त ठेवणे. To keep one's own counsel स्वतःचे बेत गुप्त ठेवणे. Queen's council (Q. C.) राणीचा सनदी वकील. ह्याला पगार नसतो. परंतु प्रत्येक कोर्टात ह्याला अग्रमान मिळतो. N. B. The words Counsellable, Counsellor, Counsellorship, &c. are spelt with a single l by Webster which is perhaps the American way of spelling. Count (kount)[O. Fr. conpter and later conter.-L. computare, to reckon. ] v. t. to reckon, to compute गणणें, मे (मे)जणे, गणना f- गणती f- मोजणी f- मोजदाद f- गणन f. करणे. २ to ascribe or impute (चा) गुण किंवा धर्म समजणे, (चें) आहे असे समजणे; as, " Abraham believed God and it was C.ed unto him for righteousness." ३ to esteems to think, judge or consider मानणे, लेखणे, गणणे, समजणे. C. v. i. to possess value or carry weight, to increase the strength or influence of some party or interest मोजण्यांत-गणण्यांत येणे, भरीस उपयोगी पडणे, (ची) किंमत असणे; as, “ Every vote C.s." ." Accidents C. for nothing." २ (with on or upon ) to rely, to depend हवाला ठेऊन राहणे, (वर) भरंवसा m, मदार f-भिस्त f- ठेवणे, अवलंबून राहणे. ३ (obs.)