पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/898

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Couch ( kouch) [Fr. coucher, to lay down, to lie down, from col & locare, to place.] v. t. बिछान्यावर बसविणे-पसरणें-निजवणे-ठेवणे-टाकणे. २ रांगेने थराने रचून ठेवणे. ३ (in papermaking) धातूच्या जाळीवरून घोंगडीवर आणून टाकणे. ४ दडविणे, लपविणे, गर्भित करणे. ५ (with in) भाषेने दर्शविणे, ग्रथित करणे. ६ (a spear) लागावर भाला रोखणे. ७ (विशेष प्रकारच्या सुईने) डोळ्यांतील मोतिबिंब दाबणे. C.v.i. निजणे, लवंडणे. २ लपणें. ३ (obs.) लवणे, वांकणे, दबणे, दबून बसणे-असणें, दबा-धरणे मारणे or धरून-मारून बसणे-असणे. C.n. पलंग m, खाट f. २ शयन n, शय्या f, मंचक m. ३ विश्रांतिस्थान n. ४ मोड येण्याकरिता जमिनीवर पसरलेल्या 'बाली धान्याचा थर m. Couch'ant a. दबा धरून बसलेला, मान वर करून बसलेला. Couch-fellow, Couch-mate n. एकाच अंथरुणावर निजणारा सोबती, सहशायी. Couch'ing n. सुईने डोळ्यांतील मोतिबिंब खाली दाबणे n. To couch a spear or lance लागावर धरणे, रोखणे (भाला.) Cough (kof) [of old Low German origin. ] n. med. खोकला m, कास m, कफ m. C.v.i. खोकणे, ढासणे. C.v.t. खोकून बाहेर काढणे (up); as, To C. up phlegm. Cough-drop, C.-lozenge n. कफनाशक गोड गुटिका. Cough'er n. खोकणारा. Cough'ing n. खोकणे n, खोकला m. Cough down (एखाद्या वत्तयास श्रोतृसमाजाने) खोकून खोकून खाली बसविणे. Coulter ( köl'-tër) See Colter. Council (koun-'sil) [Fr. concile,-L. concilium, con & calare, to call. This word is often confounded with counsel with which it has no connection.] n. मसलत करणारांची मंडळी f- संस्था f, मंत्रिमंडल (ळ) n, सभा f, मंत्रिसमाज m. २ मसलत f, खलबत n, मंत्रण n. COUNCIL-BOARD R. मसलतीस बसलेली मंत्रिसभा f. २ ज्यासभोवती मंत्रिमंडळ बसतें तें मेज n. Council-chamber n. मंत्रणशाला(ळा) f, मंत्रणगृह n. Coun'cillor (also councilor ) n. सभासद m, कौन्सिलदार m. Coun'cil man n. म्युनिसिपालिटीचा सभासद m. Council of war संग्रामसंसद्, रणसंसद्, लष्करी किंवा आरमाराच्या अधिकाऱ्यांची सेनाधिपतीबरोबर विचार करण्याकरितां बोलावलेली सभा f. General Council आणीबाणीच्या वेळी लढाई चालवावी किंवा चालवू नये असा विचार करणारी सभा f, समरमंत्रीसभा f. In Council सभागृहांत. Privy Council गूढसभा f, राजमंत्र्यांची एकांत सभा f, खुद्दनिसबतीचे मंत्रिमंडल (ळ) n. Executive Council विधायक-कार्यकारी सभा f, विधायक मंत्रिसभा f. Legislative Council विधिकारी-नियम-करणारी सभा f, कायदेकानू करणारी सभा f. N. B.-Councillor कौन्सिलचा सभासद, Counsellor सल्लामसलत देणारा. Counsel (koun'-sel) [O. Fr. conseil, from L. consilium, consulere, to consult.] n. mutual advising, consultation मसलत f, सल्ला m, सल्लामसलत f