पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/890

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Cor'respond'ence,-cy m. कागदपत्राची वहिवाट f. भेट f-संबंध m, पत्रव्यवहार m, दळणवळण n. २ कागदपत्र n. pl , जावसाली पत्रे n. pl. ३ मेळ.m, ताळा m (घे-पाह-पडणे), तालामाला m, जम m, जवा m, उतारा m, जुळणी f, जुगल f, लाग m. ४ congruity परस्परयोग्यता f, अनुरूपता f, सादृश्य n, संबंध m, बरोबरी f. Cor'respondent a. अनुरूप, सदृश, तुल्य, लायक, सहगामी. २ (obs.) आज्ञाधीन, ताबेदार. C. n. कागदपत्राची वहिवाट ठेवणारा. २ वर्तमानपत्राला खबर देणारा, बातमीदार. ३ तारेने किंवा पत्राने व्यापार किंवा व्यवहार करणारा मनुष्य m. Cor'respondently adv. Corresponder, See Correspondent. Corʻrespond'ing a. मिळणारा, जुळणारा, जुगता, बेताचा, समन्वित, अनुरूप, मिळता, अनुगुण. २ पत्रव्यवहारी. ३ math. अनुरूप, संगत. Cur'respond'ingly adv. Cor'respon'sive a. See Corresponding. Cor'respon'sively adv. Doctrine of correspondences सर्व सृष्ट पदार्थात आध्यात्मिक प्रतिरूपे आहेत व ती शोधून काढण्याची गुरुकिल्ली बायबलांत आहे असे मत n. Corridor (kawr'-ri-dör) [Fr. It, corridore or Sp. corredor, & runner, from L. currere, to run. ] arch. a gallery or passage in a house बंगल्यांतील-घरांतील सार्वजनिक तिव्हाटा-सजा m. २ fort. (R.) कोणत्याहि ठिकाणच्या किल्ल्याच्या आसपासचा झांकलेला रस्ता m, तटाभोवतालची चोरवाट.f, गूढपथ m, छन्नमार्ग m. Corrigendum (kor'-ri-jen'dum) [ L. corrigens, pr p. of corrigere, to correct. ] n, शुद्धि f, शुद्धिपत्र n. pl. Cor'rigen'da. Corrigent (kor'i-jent) [See above.] n. med. एखादे औषध नरम सौम्य करण्याकरितां किंवा त्यांतील तीव्रता कमी करण्याकरितां त्यांत जी वस्तु घालतात ती, अपायनाशक n, हितसंस्कारक n. (औषध) Corrigible (kori-ji-bl ) [ See above.] a. सुधारण्याजोगा-जोगता ; as, "A C. fault." २ (obs.) दंडार्ह, शिक्षार्ह, दंडनीय, दंड्य. ३ सुधारणारें. ४ (obs.) सुधारेल असा. Corrigibil'ity n. शिक्षार्हता, &c. Corrival ( kor-ri'val) (R.) See Corival. Corroborate ( kor-ob'-o-rāt) [L. con roborare, roboratum, to strengthen. ] v. t. (obs.) to make strong मजबूत करणे, बळकटी f- बळ n- जोर m देणे-आणणे, पुष्टि f- पुष्टिकरण n- करणे, समर्थन n. करणे. २ to make more certain बळकटी f-बळ n. देणे करणे, खरा करणे, सबळ करणे, पुष्टिकरण n. करणे g. of o. Corrob'orant, Corrob'ora'tive a. धातुपुष्ट, पौष्टिक, पुष्टिकरकारक, बलवर्धक. २ बळकटी देणारा-आणणारा. C. n. बलवर्धक-पौष्टिक औषध n. Corrobora'tion m. पुष्टिकरण n, बळकटी f- देणे n, सबलीकरण n, दृढीकरण n, बळकटी f, बळ n, मजबुती f, प्रत्यंतर n, आधार m. २ पुष्टि-बळकटी देणारी वस्तु f. Corrob'ora'tor .n. Corrob'ora'tory a.