पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/872

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Cool ( kool ) [ A. S. col, calan, to be cold.] a. slightly cold अमळ थंड, शीतल, थोडे थंड, मंदशीत, शीतस्पर्श; as, " Fanced with C. wind." २ not ardent धिमा, उदासीन, अनुत्साही, अनुत्सुक, अनास्थ, अनुत्कंठित, अनासक्तः as, " A. C. debater, lover, Patriot &c. &c. ३ not retaining heat (dress) थंड, ऊब न देणारा, ऊबदार नव्हे असा, गारट्याचा; as, "C. dress." ४ apathetic आदरशून्य, स्नेहभावशून्य; as, "A C. manner.” ५ presuming and selfish, audacious बेपरवा, उद्धट, धृष्ट, शिष्टाचाराच्या बारीकसारीक गोष्टीकडे लक्ष न देणारा; as, "C. behaviour." ६ ( applied facetiously, in a vague sense, to a sum of money (विनोंदाने-थट्टेने) रोकडा, चांगला : as, "Leavings C. thousand to Mr. Matthew Pocket. " C.n. थंडावा n, थंडोसा m थंडी f. [C. (OF THE DAY, HOURS OF MORNING AND EVENING थंडा वेळ m, OR f. शिळोपा m. शिराळ m, f.] C. v. t. to make coldish थंड करणे, उष्णता मोडणे-घालवणे. g. of o., निववणे as, "Ice cools water." २ to allay, to moderate थंड शीतल करणे, निववणे, शांत करणे : as, "To C. raging emotions, excited passions &c." ३ fig. (one's ardour, affection, &c.) थंड-मंद करणे, विरजण n- विरक्षण n. घालणे, माया पातळ करणे. C. v.i. (lit.) थंडावणे, निवणे, थंड होणे, उष्णता f. जाणे-मोडणे g. of s. २ fig. (zeal, ardour, affection) थंडावणे, निवणे, थंड होणे, आळसणे, विरजण n- विरक्षण n. पडणे in, con. ३ ( anger ) निवणे, थंडावणे, शांत-थंड होणे. Cooled a. (v. V. T. I.) थंड केलेला. मोडलेल्या उष्णतेचा, हतताप, हतोष्ण, शीतलीकृत. (v. V. I.). थंडावलेला, निवालेला. २ गतप्रीत. ३ शांत झालेला. Cool'er थंड-शांत करणारें. २ ज्या भांड्यांत प्रवाही पदार्थ अथवा दुसऱ्या वस्तु थंड होतात ते भांडे n, शीतक n. Cool-headed a. शांतचित्त n, Cool-headeduess n. शांतचित्तता f. Cool'ing a. ( an article of diet, a medicine) थंड, थंडा, शीतल pop. शीतळ, सरद, शीतवीर्य उष्णता-दाहशासक. Cool'ish a. Cool'ly a. (obs.) थंड adv. थंडपणाने, शांतपणाने, सावकाशीनें, दमाखाली, धिराईखाली, धीरेधीरे, आस्तेआस्ते. Cool'ness n. थंडपणा m, थंडाई f, शीतळाई, f, संदशैत्य n, थंडावा m, थंडोसा m. २ अनुत्साह n, अनुत्सुकता f, सावकाशी f. ३ स्नेहाची मंदी f, पातळाई f, अनुरागशैथिल्य n, ४ ( after heat) थंडावा m, थंडोसा m. Cool tankard n. शीत पेय n. Coolth (dial) थंडाई f, शीतळता f, मंदशैत्य n. To cool the heels colloq.) to dance attendance थुंकी की झेलणे, दारी तिष्ठत राहणे. To cool down थंड होणे थंड पडणे, थंडगार होणे. To take a thing coolly दसाने थंडाईने-सावकाशीने ऐकून घेणे-सोसणे. Coolie, Cooly (kõõl'i) [Hind. kūli, a porter, a labourer. ] n. बिगारी m, हेलकरी m, पांटीनाला m, (fem. पांटीवाली f,) मजूर m, हमाल m, ओझे वाहणारा माणूस m. [ BUSINESS OF A C. हेलपाटी f. ]