पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/830

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

gare, to collect into a flock, from grex, gregis, a flock.] v. t. जमा करणे, गोळा करणे, जमविणे, जमावणे, संमेलन करणे. C.v.i. जमणे, मिळणे, गोळा होणे, संमेलन होणे. Con'grega'ted a. जमलेला, गोळा झाालेला, जमा केलेला, घट्ट, घन. Congrega'tion n. act. एकीकरण n, जमवणे n, एकत्र करणे n. २ निरनिराळ्या पदार्थांचा समूह m, समुदाय m, गण m, समाहार m. ३ धर्मसमाज m, परिषद् f, सभा f, मंडळी f, जमाव m, समाज m. ४ धर्माधिकाऱ्यांचे मंडळ n. ५ स्काटलंड देशांत मेरी राणीचे वेळी एका प्राटेस्टंट पंथाच्या लोकांनी घेतलेलें नांव n. Con'grega'tional a. सामाजिक, समाजसंबंधाचा, स्वतंत्रधर्मपध्दतीसंबंधी. Con'grega'tionalism n. स्वतंत्रधर्मपद्धति f. प्रत्येक सभेची व्यवस्थातींतील सभासद आपल्या विचाराप्रमाणेच करतात. त्याबद्दल ते कोणावर अवलंबून नसतात, किंवा त्यांच्यावर कोणाचा ताबा नसतो, अशी ज्यांत व्यवस्था आहे, असा एक ख्रिस्तधर्मीयांचा पंथ m, स्वविचारानुवर्ति-स्वावलंबी धर्मसमाजपद्धति f. Con'grega'tionist n. स्वतंत्रधर्मपद्धतीचा अनुयायी m. Congress ( kong'gres) [L. congressus, to go or come together, from gradus, a step.] n. a gathering or assembly, a conference सभा f, संडळी f. २ स्त्रीपुरुषसंगम m- समागम m. [SEXUAL C. स्त्रीपुरुषसंग m, मैथुन n. To BE JOINED IN SEXUAL C. जुगणे, लागणे.] ३ महापरिषद् f. ४ प्रतिनिधिसभा f. ५ the lower house of the Spanish Cortes स्पेन देशांतील साधारणप्रतिनिधिसभा f. C. v. i. सभेमध्ये जमणे-मिळणे, सभा भरणे. Congres'sional n. Con'gressman n. (सभेस पाठविलेला) प्रतिनिधि m, सभासद m. The Congress (in India) हिंदुस्थानची राष्ट्रीय सभा, हिची स्थापना इ. स. १८८५ साली डिसेंबर महिन्यांत मुंबई शहरी झाली. Congrue (kong-groo') (L. congruere, congruus, to come together, to coincide.] v. i. ( Shakes.) मेळ असणे, जमणे, अनुकूल होणे. Con'gruence, Con'gruency n. (v. A.) मेळ m, मिलाफ m, जम m, अनुसंधान n, आनुगुण्य n, आनुकूल्य n, अनुकूलता f, समन्वय m. Con'gruent a. जमावाचा, मिलाफाचा, मिलाफी, बेताचा, एका जमाचा, योग्य, यथायोग्य, सयुक्त, उपयक्त. [C. TRIANGLES समभुज व समकोन त्रिकोण m.] Con'gru'ity n. See Congruence. Con'grnous a. See Congruent. Con'gruously adv. योग्य (S.), यथायोग्य. Con'gruousness n. See Congruence. Conic,-al, Conics, See under Cone. Conic section, Conicoid, See Cone. Conifere ( kon-if'er-ė) (L. conus, cone & ferre, to bear. ] n. pl. देवदारूसारख्या झाडांचा वर्ग m. Conifer n. आडवें वाढणारें बुंध्याला वाढणारे झाड n, देवदारवर्गातील झाड n. Conif'erous a. कोन असलेलें, शंकूचें, सकोन. Conjecture ( kon-jek’tūr) (L. con, together & jacere, to throw.] n. guess, conjecture अनुमान n, अंदाज m