पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/825

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाळणारा, अनुसरणारा. Conform'ist n. कायद्याने स्थापलेल्या धर्मास अनुसरून वागणारा m, प्रवृत्तधर्मानुसारी m. Confound (kon-fownd' ) [O. E. confoundre--L. confundere p. p. confusus, to pour together, to mingle, to perplex, to overwhelm.] v. t. to mingle Confusedly, to disorder घोंटाळा m- गोंधळ m. करणे, अव्यवस्था f- उलटापालट f- उलथापालथ f-संकर m-भानगड f - करणे with g. of o., (loosely) गडबड f. धांदल f. करणे g. of o. २ to mistake for another, to identify falsely अन्यथा भलतेच समजणे. ३ to throw into confusion or disorder, to perplec.c, to strike with amazement, to dismay घोळांत-गोंधळात-गळफट्यांत-गोफाट्यांत-भ्रमांत-पाडणे घालणे-टाकणे, भ्रम पाडणे-घालणे, गाेंधळवून टाकणे, बावरवणे, (आश्चर्यचकित करून) गोंधळविणे-विस्मित करणे, गडबडवणे, (भयातिशयाने) मूढ करणे, घाबरविणे, बहकाविणे, (अतिशय भयाने कर्तव्यशून्य होण्याइतके) घाबरवणे-गांगरवणे. ४ to overthrow, defeat or bring to nought ( a scheme, plan, hope, &c. ) ( बेत ) फिसकटावणे, (आशा) निष्फल करणे, कट मोडणे-उडवून देणे. ५ to destroy, to ruin, to waste नाश करणे, वायांव्यर्थ दवडणे, अपव्यय करणे; as, "One man's lust these many lives confounds. " Shakes. ६ to abash, to put to shame (गोंधळून जाईल इतका) शरमिंदा-ओशाळा करणे, खाली पहावयास लावणे. ७ In cases or' imprecations used in the imperative third person sing as an equivalent or substitute for 'bring to perdition'; now it is regarded as a mild form of imprecation & vaguely associated with other seuses. जळो, मरो, आग लागो, सत्यानाश होवो इ० अर्थी Confound क्रियापदाचा तृतीय पुरुषी एकवचनी आज्ञार्थी प्रयोग होतो. Confound'ed p. p. ( See the verb). २ colloq. पक्का पुरा, पूर्ण; as, " He was a most C. Tory". ३ बिलंदर, अट्टल, इरसाल. ४ निंद्य, अमंगळ, ओंगळ; as, “ This is his C. impudence." [ To BECOME C. (भयातिरेकाने) मूढ होण, बावरणे, घाबरणे,घोटाळणे , गडबडणे, गोंधळणे, चकित होणे, गांगरणे, गांगावणे. ] Confound'edly (collog. ) तिरस्काराने. २ शरमेने, लज्जेने. ३ पूर्णतेनें. ४ निंद्यपणे, अमंगळपणे. Confound'er n. गोंधळवणारा, &e. Confound'ing p. a. गोंधळवणारा, घाबरवणारा, &c. C. n. (v. V.T. )-act. गोंधळवणे n, संकरीकरण n.-state अव्यवस्था f, घालमेल f, गोंधळ m, घोळ m, घप्पाघोळ m, घोळंकार m, वोळणा m, गफलत f, गडबड f, गलबल f, गलफटा m, घोंटाळा m, गुरफटा or फाटा m, संकर m, ब्रह्मघोळ m, गलत f, गलद f, भिसमिल्ला m, झंगड f, भानगड f, बचबच f, चवचव f, ढवढव f, धांदल f, धांदलपट्टी f, धांदलाधांदल f, गडबडगुंडा m. [ Everything there is in C. and disorder पण तेथे पुरी बजबज माजली आहे, खूब घोटाळा माजून राहिला आहे. ] २-act. बावरविणे n