पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/823

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Confiscate (kon'fis'kāt) [L. confiscure, confiscutus, to confiscate, properly to lay up in a chest, from Con & fiscus, a basket, a purse, a treasury. See Fiscal. ] v. t. to seize as forfeited to the public treasury दंडार्थ हरण करणे, (सरकाराने ) दंडासाठी घेणे-जप्त करणे, (दंडासाठी ) खालसा करणे-सरकारांत घेणे, (दंडमूलक) हरण करणे. C. a. ( दंडासाठी) खालसा केलेला, सरकारांत घेतलेला, दंडादाखल घेतलेला. Confis'cable, Confis'cator'y a. जप्त करण्याजोगा, जप्त करणारा. Con'fisca'tion n. (v. V. I.) सरकारांत घेणे n, खालसा करणे n, दंडार्थ हरण n, दंडमूलक हरण n. Con'fisca'tor' n. (दंडार्थ) खालसा करणारा, दंडार्थ हरण करणारा. N. B.---Confiscate ( राजाने ) हरण करणे. ह्या हरणामुळे मूळ मालकाचे सर्व हक्क नष्ट होऊन हरण केलेल्या मालावर राजाची कायमची मालकी होते. Confiscate याचा अर्थ जप्त करणे असाही पुष्कळ ठिकाणी आढळतो, परंतु Attach शब्दाचा अर्थ जप्त करणे असा ठरवून टाकला तर बरे होईल. कर्जाचे पैसे आल्यामुळे ऋणकोचे मालावर जी जप्ती नेतात तिला Attachment म्हणतात. बंडखोर किंवा इतर राजद्रोही अपराध्यांची मिळकत सरकारांत जप्त होते त्या जप्त होण्याला किंवा करण्याला Confiscation असे म्हणतात. Conflagrate (kon'fla-grät) [Fr. conflagration.-L. con, inten. & flagrare, to blaze. ] v. t. (R.) जाळणे. C. v. t. जळणे. Conflagʻrant a. (R.) जळणारा. Conilagra'tion n. a general burning आगीचा डोंब m, लोळ m, डोंबाळा(ळी). [C. OF A FOREST वणवा m, दावाग्नि m, दावानल m.] Conflate ( kon-flat) (L. con & flare, to blow. ] v. t. (R.) to blow together' एकत्र फुंकणे-वाहविणे, उत्पन्न करणे. २ ग्रंथाचे दोन निरनिराळे पाठ एक करणे, पाठ भेदांचे मिश्रण करणे. Confla'tion n. Conflict ( kon'flikt) [L. can, together & fligere, flictus, to strike. Distinguish carefully conflict and contest. A contest is a strife for a common object or reward or prize; while a conflict is a violent meeting of two forces or individuals. "In the wars of the Roses two contending Houses had many conflicts between them.” Contest looks to the end, conflict emphasis antagonism.] n. एकमेकांवर जोराने आदळणे n, एकमेकांचा धक्का m, टक्कर f. २ espec. a prolonged struggle, contest युद्ध n, झुंज f, झोंबी f, झगडा m, संप्रहार m, संग्राम m, सामना m, लढाई f. ३ a mental or spiritual struggle within man मानसिक चलविचल f- खळबळ f, व्यग्रता f. C.v.i. लढणे, झुंजणे, झुंज n- &c. करणें or in. con. with g. of o. लागणे, झोंबी घेणे. २ एकमेकांशी टक्कर होणे. ३ विरोधी होणे. Conflic'ting a. contrary, opposite एकमेकांवर जोराने आदळणारा, प्रतिकूल, विरुद्ध, विरोधाचा, विरोधी, पर