पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/822

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माळा m, बंधारण n, बंध m, बंद m, धरबंद m, बंधन n. २. state. बद m, बंदी f, कैद f, अटक f, कोंडी f, कोंडणी f. निग्रह (S) m, निरोध (S) m, निर्बंध (S) m [PLACE OF.O. बंदीखाना m, तुरुंग m, कारागार m, बंदीशाळा f, अंधारकोठडी f, spec. अंधारकोंडी f, spec. अंधारखण m or णी f. RELEASE FROM C. बंधमोचन n, बंदखुलास m. SOLITARY C. एकांत कैद f, अंधारकोठडी f.] ३ lying in delivery प्रसवावस्था f, प्रसूतीमुळे झालेला प्रतिबंध m, बाळंतपण n. Confin'er n. Confin'ing a. N. B.-Border हद्द, Boundary मर्यादा, Bounds चतुसीमा, Frontier सरहद्द, Confines सीमा, शीव, Precincts आवार. Confirm ( kon-fem' ) [O. F. confermer- L. con, inten, & firmars, to make firm, from firmus, firm.] v.t. to corroborate स्थिर-दृढ-कायम करणे, खरासत्य-शाबूत-पक्का-नक्की-खचीत-निश्चित &c. करणे, संशय काढून टाकणे, खरेपणाविषयी खात्री-शाबिती देणे; as, " To C. a statement." २ to make form or former, to add strength to, to establish बळकट-दृढ-सुदृढ करणे, सबळ करणे, स्थापणे, ठरविणे; as, " C.ed the same unto Jacob for a law." [TO BE CONFIRMED (A DISEASE) बळावणे, जडावणे, जडकावणे(?), जुनावणे, जुनाटणे.] 3 to strengthen in judgment or purpose (मन किंवा उद्देश) घट्ट-बळकट-बद्धमूल-&c. करणे, सुस्थिर करणे; as, " Confirmed, then, I resolve Adam shall share with me in bliss or woe." ४ to ratify बहाल-काई. (य) म-मुकरर-मंजूर करणे, सई f. करणे ; as, "To C. the appointment of an official." ५ (Eccl.) to administer the rite of confirmation दृढीकरणाचा संस्कार करणे. Confirm'able a. कायम करण्यालायक, &c. Confirma'tion n. (v. V. I.) the act of confirming or strengthening बळकट करणे n, खरावणे n, सत्यीकरण n, दृढीकरण n, निश्चितीकरण n, स्थापन n.-state खरावलेलेपणा m, बळकटी f, मजबुती f, मुकररी f, दार्ढ्यं n. २ the act of ratifying or sanctioning बहाल करणे n, सई f, बहाली f, मंजुरी f. ३ corroborative or convincing evidence पडसाक्ष f, प्रतिप्रमाण n, खात्री करणारा पुरावा m, शाबिती f. ४ Eccl. दृढीकरणसंस्कार m. Confirm'ative, Confirm'atory a. बळकट-मजबूत-स्थिर करणारा, स्थिरकारी, अनुवादक. २ (ख्रिस्ती धर्मात बाप्तिस्याःनंतरचा) दृढीकरणसंस्कारासंबंधी. Con'firma'tor, Confirm'er n. (v. V. I.) खरें करणारा, खरावणारा, बळकटी-मजबुती आणणारा, बळकट करणारा, सत्याख्यापनकर्ता, स्थापक, स्थापनकर्ता. Confirmed' p. (v. V. I.) खरा-बळकट केलेला, संवयीचा, दृढ झालेला; as, "A C. habit." २ बहाल केलेला, मुकरर केलेला, मंजूर. Confirmee' n. law. ज्याची मालकी मंजूर किंवा स्थापित केली असेल तो, कोर्टाने ठरविलेला मालक m- वारस m. २ कायम केलेला मनुष्य m. Confirm'ing n. N. B.-Confirm स्थिर-दृढ-कायम करणे, Corroborate