पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/813

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

the brightness is increased. (तेज:किरणे एकवटवून) तेज प्रखर करणे, तेजोदृंहण करणे. ३ elect. to increase the amount or intensity (charge of electricity) विद्युत्संचय- विद्युतसंचार तीव्र करणे, विद्युत्संचाराचं दृंहण करणे. ४ वायुरूप पदार्थाला द्रवाचे रूप देणे, (अदृश्य वायु) दाट किंवा दृढ करून दृश्य करणे. ५ to contain in a condensed state दृढ-दाट स्थितीत धरणे-ठेवणे as, "The powerful gem condensed primeval dews." ६ fig. to bring together closely or in small compass जवळ जवळ नेणे, दाट करणे. ७ to compress thought or meaning into few words संक्षेप करणे, संकलन करणे, सार काढणे. ८ to concentrate, to intensify दृढता वाढवणे, एका केंद्रांत आणणे, (एका केंद्रांत आणून) जोर वाढविणे. ८.to. concentrate. दाट होणे. २ थोड्या स्थलांत-अवकाशांत येणे. ३ केंद्रीभूत होणे, एकवटणे. Conden'sable a. (see the Several meanings of the verb), दृढभवनीय, दाट-दृढ-घन करता येण्याजोगा-सारखा, &c. Condensabil'ity n. the quality of being condensable दृंहणीयता f, दृढभवतीयता f, दृढ-दाट होण्याजोगी स्थिति f-शक्ति f, सारमवनीयता f, केंद्रीभवनीयता f. Conden'sing p. n. दाट करणे n. २ दाट होणे n. Con'densa'tion n. दाट होणे n., दाट करणे n, दृढीकरण n, दृढीभवन n. २ reductions of Volume आकार-परिमाण लहान होणें n, आकारदृंहण n. ३ optics. (तेजाचें) दृढीभवन n, दृंहण n. ४ (वायुरूप पदार्थाचे) द्रवीभवन, दृंहण n. ५ condensed condition दृढीभूत स्थिति f, दार्ढ्य n. Condens'er n. दृंहक. २ ( In Distillation, Steam-engine, gas-works, metallurgy, pneumatics, wool-manufacture, sugar-manufacture ) दृंसक or शीतक. Conden'sible a. Conden'sity n. N. B.-It will be better if the following distinctions are made : Solidify-घन-वण करणे, Condense दाट-दृढ करणे, Accumulate संचय करणे, Add संकलन करणे. Accumulator संचायक, Condenser दृंहक (from दृंह in दृढ). Condescend ( kon'dē-send') [ from Fr. condescesedre, from L. condescendere, con, together & descendere, to descend. To condescend originally meant to come down voluntarily. But this sense is now obsolete. Its current senses are:) v. i. to come bend down so far as a particular action is concerned from one's position of dignity or pride आपल्या हाताखालच्या-कमी दर्जाच्या लोकांशी) निरभिमानतेने वागणे, अभिमान सोडून वागणे, मोठेपणा एकीकडे ठेवणे. अभिमानत्यागपूर्वक आचरण करणे, (loosely) मेहेरबानी-दया करणे, अनुग्रह करणे. २ often used ironically, implying an assumption of superiority) मोठेपणा एकीकडे ठेवल्याचे ढोंग करणे as, "Those who thought they were honouring me by descending to address a few words to me." ३ कबूल करणे, संमति देणे. ४ (विनयातिश