पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/812

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काम करून घेणे, जबरदस्तीने काम करून घेणे, दहशत घालणे; as, " Every party ought to tolerate a dissentiont minority & not concuss it into acquiescence.” Concus'sion n. हालवणे n. २ धक्का m, गचका m, हबका m. ३ दपटशा m. ४ med. एकदम (धक्का बसल्यामुळे किंवा उंचावरून एकदम पडल्यामुळे) इंद्रियव्यापार मंद होणें n, इंद्रियव्यापाराची मंदता f, बधिर होणे n, लटका पडणें n; as, "A C. of the brain.” २ बधिरता. Concus'sive a. Condemn (kon-dem') (L. con, very much & damnare, to condemn.] v. t. to pronounce an adaverse judgement upon विरुद्ध टीका करणे, विरुद्ध निर्णय देणे, (संबंधी) नापसंती दर्शविणे. २ (opposed acquit, absolve) to convict of guilt दोष ठेवणे-लावणे सदोष-दूषित करणे-ठरविणे. ३ to sentence to punishment, suffering or loss ( with to before the penalty) अन्याय आंगी लावून शिक्षा सांगणे, शिक्षा देणे-ठोठावणे, अपराधी-सदोष ठरवून दंड करणे, अपराधी म्हणून शिक्षा सांगणे, (अपराधकथनपूर्वक-अपराधक्षालनार्थ) दंडाभिधार करणे, दंड ठोठावणे. ४ to amerce or fine (with in before the penalty ) दंड करणें, दंडाची शिक्षा देणे; “ The King of Egypt condemned the land in a hundred talents of silver.” ५ to adjudge or pronounce to be unfit for use or service निकामी-निरुपयोगी-अनुपयोगी ठरविणे, रद्द करणे; as, "The ship and her cargo were condemned.” Condem'nable a. नालायक ठरविण्याजोगा, रद्द करण्याजोगा. २ शिक्षार्ह, गुन्हेगार ठरविण्याजोगा.३ निंदनीय, दूषणीय, निंद्य. Condemnation n.-act. अन्याय आंगी लावून शिक्षा सांगणे n, दंड करणें n, दंडनियोजन 2, दंडन n. state दंड केलेली स्थिति f, नियोजितदंडत्व n. २ ground or reason of C. दंडहेतु m, दंडकारण m, दोषकारण n, दोषी-अपराधी-शिक्षापात्र ठरविण्यास कारण; as, "Speak or thy silence on the instant is, thy condemnation and thy death." ३ a sentence of forfeiture जप्त करण्याची शिक्षा; as, " A condemnation and thy express ground that the ship is enemies' property," ४ निंदा f. दूषण n, दोष m. ५ गुन्हेगार ठरविणे n. ६ शिक्षा f, सजा f, दंड m. Condem'natory a. दंड-शिक्षा सांगणारा, दंडाचा, शिक्षेचा. २ निंदात्मक, &c. Condemned' a. खोटें-सदोष-निरुपयोगी-दोषी ठरविलेला. २ कैद्याच्या उपयोगाचे करितां; as, "Condemned cell or house." ३ शिक्षा ठोठावलेला. ४ वाळीत टाकलेला. ५ रद्द केलेला us, "Condemned house or bridge." ६ (निरुपयाेगी-दोषी-अपराधी म्हणून) शिक्का मारलेला. Condense (kon-dens') [ From. Fr. condenser.,- condensare, condensus, condense.] v. t. to make dense, to increase the density of, to reduce in volume, to thicken, to concentrate घण-घन-घट्ट-दाट-दृढ-घनावयव, &c. करणे. २ optics. to bring (rays of light) to a focus or into a smaller space, so that