पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/798

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संख्या, यौगिक-मिश्रसंख्या. Composite portrait अनेक तसबिरी एकत्र करून केलेली तसवीर f. Composite ratio योगनिष्पत्ति. Composition metal मिश्रधातु, ही तांबे, जस्त व दुसऱ्या धातु यांची बनविलेली असून तिचा उपयोग जहाजांस पत्रे मारण्याकडे करतात. Composition of a felony काही अंतःस्थ लाभासाठी गुन्हेगाराची चौकशी न करितां गुन्हेगारास सोडून देतात तो गुन्हा (अशा गुन्ह्याबद्दल दंडाची व कैदेची शिक्षा सांगितली आहे). Composition of forces प्रेरणेकीकरण n. Composing rule ओळपट्टी f, पितळपट्टी f. ओळी निराळ्या पाडण्याची पट्टी f. Compotation ( kom-po-tā'shun) [L. com, together & potare, to drink.] n. (R.) drinking together - सहपान n, संपीति f. Compotationship n. Com'potator n. (R.) सहपान करणारा कर्ता, सहपानी. Compot'atory a. (R.) Compound (kom-pownd') [ O. E. componare, M. E. compounen, L. componere, from com & ponere, to place, put or act, excrescent. ] v. t. to mingle मिश्रण करणं, मिळवणे, मिसळणे, एकवट करणे, भेळणे, संमेलन करणे. २ to adjust तोडणे, तोडजोड काढणे, तोड पाडणे, तोड काढणे, तोड करणे. ३ gram. समाससमाहार करणं. C. v. i. to come to terms of agreement तोडजोड करणे, तोडीवर येणं, कावडतावड-खांजणीभांजणी करणं. C. a. not simple मिश्र, संयुक्त, मिश्रित, मिसळीचा, भेळीचा. [COMPOUND BODY संयुक्त पदार्थ m. C. FRACTION n. प्रभागजाति अपूर्णांक m, भागापवाह-स्वांशा-पवाह-स्वांशानुबंध-अपूर्णांक m. C. FRACTURE सव्रण अस्थिभंग, हाड आणि त्यावरील मांस व त्वचा यांना झालेली खोंक f - जखम f. (या खांकेत हवा शिरते), मिश्र अस्थिभंग m. C. INTEREST चक्रवाढ व्याज n, चक्रव्याज n, चक्रवृद्धि f. C. MULTIPLICATION n. विविध गुणाकार m. C. NUMBER विविधसंख्या. C. PROPORTION n. नमस्तराशी. C. QUANTITY अनेकपदसंख्या. C. RADICAL विविधमूळक m. C. RATIO संयुक्तगुणोत्तर, योगनिपत्ति. CHEMICAL C. रासायनिक सम्मेलन n, रसायन n.] २ gram. समासाचा, समस्त, सामासिक. C. n. mixture मिश्रण n, मिसळ f, मिसळा m, संयुक्त पदार्थ m ; as, "Rare C. of oddity, frolic, and fun." २ chem. रासायनिक संमेलन n. ३ gram. समास n. [ DISSOLUTION OF A C. विग्रह m.] Compound'able . पक्षकारांनी फिर्याद केल्यानंतर आपसांत तोडण्यासारखा ( गुन्हा), तोडी. योग्य, &c. Compound ed a. मिश्र, मिश्रित, संयुक्त. २ तोडजोड केलेला. ३ समासाचा, सामासिक. Compounder n. need. संम्मेलक, औषधमेलनकर्ता, रोग्याकरितां दवाखान्यांत औषध तयार करणारा. २ तोडजोड करणारा, समजूत पाडणारा-घालणारा, तोडीवर आणणारा. Compound'ing n. मिसळणे n, मिळवणे n, मिश्रण n, संमिश्रण n, संमेलन n. २ तोडणे n, तोडजोड करणे n, तोडमोड करणे n. ३ समास करणे n. Compound sentence संयुक्तवाक्य n. N. B.-In the phrases Compound subject, Com