पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/788

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

०., तुलना f- मुकाबला m - रुजूवात f. करणे-पाहणे with g. of o., जोडणे, जोडून पाहणे, तुळणे, ताळा m. पाहणे with g. of.a. मिळवून-लावून-ताडून पाहणे, रुजू घेणे. २ (R.) उपमा f देणे, तुलना f- बरोबरी f. करणे तुळणे, बोलणे. ३ gram. to form the comparative or superlative degree of (श्रेष्टता-कनिष्टता दाखविण्याकरितां) विशेषणाचा व क्रियाविशेषणाचा तारतम्यभाव दाखविणे. C. v. i. (शी) सारखं असणे. २ (शी) साम्य n- बरोबरी f करणे. C. ( obs. ) बरोबरी f, तुलना f. Com'parable a. तुलना करण्याजोगा, मिळवून पाहायाजोगा-जोगता, तुळायाजोगा, तुलनार्ह, तुलना पात्र. २ उपमा देण्याच्या योग्यतेचा, तुळण्याजोगा, तुळायाजोगा, उपमेय. Com'parableness n. तुलनार्हता f. Com'parably adv. Compar'ative a. तुलने-उपमेसंबंधीं. २ अवधिसाकांक्ष, अवधिसापेक्ष, अन्यापेक्ष, सापेक्ष. ३ gram. तर-भावदर्शक, अधिकता किंवा न्यूनतादर्शक. ४ तुलनादर्शक, तुलनात्मक; as, C. Anatomy तुलनात्मक शारीरशास्त्र. Compar'atively adv तारतम्य पाहिले असतां, बरोबरी केली असतां, मिळवून पाहिले असता, तारतम्याने, सापेक्षतेने. Com'pared a. तुलना केलेला, जोडून-ताडून पाहिलेला. २ तुळलेला, उपमित, तुलित. Com'parate n. (in logic) उपमानोपमेयांपैकी एक, उपमान किंवा उपमेय ह्यांपैकी एक Com'paring n. तुलना करणे, &c. Compa'rison n तुलना करणे, मुकाबला m, रूजुवात.f, तुलना f, उपमा f. [ STANDARD OR MEASURE OF C. उपमान n, अवधि m. [To STAND A C. WITH तुलनेस n. उतरणें.] २ तुलना f, उपसा f. ३ ता-भावदर्शक किंवा तम-भावदर्शक विशेपणाचे रूप देणे. ४ iliustration उदाहरण n, उपमा f, दाखला m, दृष्टांत m. [SUBJECT OF C. उपमेय n.] ५ capacity or possibility of being compared बरोबरी f, तुलना f, तुल्यभाव m; as, Is there any C. between them or in the phrases without comparison, out of ali comparison, beyond comparison &c. Compartment ( kom-pärt'ment ) [Fr. compartiment L. pars, partis, a division.] n. घर n, पूड n' खण m, दालन n, भाग m, खंड m, विभाग m, अंश m. २ आगगाडीच्या डब्याचा खण m. ३ शाला f; as "Singing C." संगीतशाला f. ४ कोष्टक n. ५ कक्षा f. Compass ( kum'pas ) [Fr. compas.-L. L. compassus, a circle, prop., a stepping together, from com and passus, a pace or step. ] n. circumferere. घेरा m, घेर m, परिधि m, वेढ m, परिघ m. circuitous route चक्कर f, फेरा m, गिरकांडा m. गिरकांडी f, गरका m, वळसा m. [ To FETCH A C फेरा करणे-घालणे, गिरकांडा m-फेरा m-वळसा m-गरका घेणे-मारणे, घिरटी f. घालणे.] ३ capacity पोट n, अवकाश m, कव n, कवळ n, खातें n. ४ range, sphere आटोका m, आवांका m, पोहोंच f, धांव f, पंथ' विषय (S) m, टप्पा m, मारा m. ५ ( of the voice or instrument) फेर m, घर n. ६ (of mariners) हाेका