पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/774

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

you. C. v. i. अधिकार m अम्मल m. असणे. २ टप्यांत-माऱ्यांत-रोखांत असणे. C. n. order, precept आज्ञा f, हुकुम m, हुकमत f, आदेश m, निदेश m, नियोग m, कहा m, विधि m, विधान n, अनुज्ञा f, चोदना f. २ सत्ता f, अधिकार m, प्रभुत्व n. ३ स्वामित्व n, आधिपत्य n, सरदारी f, हुकमत f, शालन (S.)n, नायकी f. ४ दृष्टिमर्यादा f. ५ सत्ता f, अम्मल m, ताबा m. ६ हवाला m, चार्ज m, तैनात f, तसलमात f. ७ एका लष्करी अधिकाऱ्याच्या ताब्यांतील सैन्य n- प्रदेश m. Command'able a. हुकुम करण्यास योग्य, सत्ता चालविण्यास योग्य. Commandant' n. आज्ञा f. हुकूम m. करणारा-देणारा, आज्ञापक. २ हुकुमत-शासनस्वामित्व करणारा, आधिपति, नायक, सरदार, जमादार, सेनापति. Commandant'ship n. सेनापत्य n. Command'ed a. आज्ञापलेला, आज्ञप्त. Commandeer' v. t. सैन्यांत नोकरी करावयास लावणे, लष्करी उपयोगास घेणे. Command'er n. कह्यांत-ताब्यात ठेवणारा, सरदार m, नायक m, (वर) सत्तागाजविणारा m, सेनापति m. २ nary. कप्तानाच्या खालच्या दर्जाचा अधिकारी m, रोखांत ठेवणारा. ३ धुमस f, मोगर f, मोगरी f, लाकडाची जड हातोडी f, ठोकणी f. Commandress n. fem. आधिपत्य चालविणारी. Commander-in-chief n. मुख्य सेनापति m, सेनानायक m, सेनाध्यक्ष m. Command'ership n. सेनाधिपत्य n. Command'ing a. हुकूम करणारा, सत्ता चालविणारा. २ छाप पडेल असा, छाप ठेवणारा, भव्य, थोर. ३ टप्यांत येईल असा, उंच. Command'ingly adv. Command'ment n. आज्ञा f, हुकूम m, निदेश m, आदेश m. २ script. मोझेसने दिलेल्या दहा आज्ञांपैकी एक. ३ सत्ता.f, अधिकार m. ४ law दुसऱ्यास कायदा मोडावयास लावण्याचा अपराध m. Commander of the faithfulही खलिपाची पदवी आहे. At one's command पाहिजे तेव्हां-जरूर लागेल तेव्हां मिळण्यासारखा. On one's command अधिकाराने, हुकमानें. The Ten Commandments the Decalogue (ख्रिस्ती मताप्रमाणे) ईश्वराने मोझेसला दिलेल्या दहा आज्ञा. Commatic (kon-mat’ik) (L. commaticus, See Comma.] a. brief, concise संक्षिप्त, अल्प विस्ताराचा, लहान लहान वाक्याचा. Com'matism n. conciseness in writing लिहिण्यांतला संक्षिप्तपणा m, थोड्या शब्दांत पुष्कळ अर्थ आणणे n, अल्पशब्दकता असणे n. Commeasure (kom-mezli’ür ) [In com and measure which see. ] v. t. to coincide with, to equal (शीं) मापाने बरोबरी करणे, समपरिमाण असणे. Commeas'urable a. समपरिछिन्नमान. Commemorate (kom-em'o-rūt) [L. commemoratus, p. p. of commemorare, to call to memory, from com & memorare, to mention-L. memor, mindful.] v.t. to call to remembrance, to celebrate with solemnity (प्रिय किंवा महत्वाच्या विद्यमान गोष्टीचे किंवा विपयांचे) स्मरण n- आठवण f. राखणे, स्मरणतिथि किंवा नियम पाळून (ची) आठवण राखणे, स्मरणोत्सव करणे,