पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/773

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुःख n. Job's Comforter' समाधान करण्याच्या मिषाने तुम्हीच आपल्यावर हे संकट ओढून घेतले असे म्हणून अधिक मात्र दुःख देतो तो. २ गळूं n, केंसतोड n. N. B.-Cheer खेद किंवा निराशा नाहीशी करून उत्साह आणणे. Console दुःखपरिहार करणे. Comfort. See above. Comic ( kom’ik ) [ L. comicus, relating to comedy. See Comedy.] a. relating to comely as distinct from tragedy आनंदपर्यवसायी नाटकासंबंधी. २ raising mirth हसें उत्पन्न करणारा-पिकवणारा, हास्योत्पादक, हास्यजनक. ३ बेडौल-विजोड किंवा विक्षिप्त असल्यामुळे हसें उत्पन्न करणारा; as, C. proportions. C. n. (colloq.) ( obs.) (मनरंजनासाठी) हसें उत्पन्न करणारा मनुष्य m, हसव्या m. २ collog. ( short for comic paper ) बेडौल चित्रांचे विनोदी वर्तमानपत्र n. Com'ical a. आनंदपर्यवसायी नाटकासंबंधी, हास्योत्पादक नाटकासंबंधी. २ हास्यकारक, विनोदी. Comical'ity n. Com'icalness n. त-हेवाइकपणा m, हास्योत्पादकता f. Com'ical'ity हास्योत्पादक वस्तु-प्रसंग. Com'ically adv. Comique n. (आपल्या नाट्याने किंवा गायनाने) हसें उत्पन्न करणारा मनुष्य, हसव्या. N. B.-Comical (विलक्षणपणामुळे-वेढप आकारामुळे-अपरूपतेमुळे) हसें उत्पन्न करणारा. Ridiculous उपहासास्पद. Ludicrous हास्योत्पादक, हास्यकारक. Comitia ( komish'i-a) [L.] n. 'कामिशिया,' प्राचीन रोमन लोकांतील कायदेकानू करणारी व राज्याचा कारभार चालविण्याकरितां अधिकारी नेमणारी सभा f. N. B. For more information about the three kinds cf comitia, refer to any text-book on Roman History. Comity (kom’i-ti) (L. comitus, from comis, courteous. cf. शग्म (S), kind.] n. सुजनता f, सौजन्य n, सभ्यता f, अनुनय m. [C. OF NATIONS राष्ट्रीय शिष्टाचार, राष्ट्रांतील परस्परशिष्टाचार m, राष्ट्रांतील सलोखा m.] Comma ( kom'a.) [L. comma. .Gr. komma, a section of a sentence, from koptein, to cut off.] n. स्वल्पविराम चिन्ह (,) n. २ ( Shakes.) ( obs.) वाक्याचा अल्पभाग m. ३ fig. अल्पविराम m. Inverted commas अवतरणचिन्हें ( "..."). Command ( kom-mand' ) [O. E. commanden.-O. Fr. commander.-L. com and mandare, to commit, to command.] v. t. to order with authority, to direct, to bid, to charge आज्ञा f- हुकूम m. करणे-देणे, ताकीद करणं-फर्माविणे-देणे. २ to exercise direct authority over सत्ता f, हुकूम m,-अधिकार m. चालवणे, आधिपत्य n-स्वामित्व n-चालवणे, सरदारी f. सरदारकी f. चालवणे, आधिपत्य n. असणे with वर of o. ३. ( उंच असल्यामळे) आटोक्यांत-माऱ्यात-टप्यांत-नजरेखाली-नजरेत ठेवणे-रोखणे, लक्ष्यणे. ४ (Shakes.)हक्काने मागणे; as, This speech commands admiration, ५ ( B.) देणे: as, I will C. my blessings upon