पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/770

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



येणारा, भविष्य काळाचा; AS, “ IN TIMES TO COME." To C. ABOUT' घडून-वनून-होऊन येणे, घडणे, होणे. २ फिरणे, वळणे, फिरून येणे. To C. ABROAD (a) परदेशांत जाणे-येणे. (b) (obs.) जाहीर होणे, बाहेर पडणे. To C. ACROSS अनायामें-एकाएकी-दैवयोगाने मिळणे-नजरेस पडणे in. com. & g. of. o TO. C. AFTER मागुन जाणे, अनुसरणे. २ मिळणे, लाभणे. To C. AGAIN परत माघारी-येणे, ठिकाणी येणे. To C. AND GO येणे-जाणे, जाये-येजा होत असणे बदलणे. To C. AT पोहोचणे, मिळविणे; AS, "To C. AT A TRUE KNOWLEDGE OF OURSELYES." २ आंगावर चढून-चालत जाणे. To C. AWAY सुटून येणे, निघणे, वेगळा होणे. To C. BETWEEN मध्ये येणे, वेगळा-भिन्न करणे. To C. EX मिळवणे, प्राप्त-संपादन करणे. २ जवळ जाणे. To C. DOWN चांगल्या स्थितीतून वाईट स्थितींत जाणे. २ खाली उतरणे, पडणे, मोडकळीस येणे. ३ स्वस्त होणे, किंमत उतरणे. To C. DOIN UPON ( colloq.) तोंडची शिक्षा करणे, (शिक्षा देण्याकरितां) तोंडाने झाडणे. To C. HIGH OR. LOW किंमत ज्यास्त किंवा कमी पडणे. To C. HOME ममी लागणे, मनांत विवणे-ठमणे. २ आपल्या घरी येणे. ३ naut. नांगर वर उचलणे. To C. IN प्रवेश करणे. २ येऊन पाेचणे. ३ अधिकाराची सूत्रे हाती घेणे. ४ मान्य-वश होणे. ५ प्रचारांत आणणे. ६ भाग वगैरे जोडले जाणे. ७ उत्पन्न होणे. ८ पिकून तयार होणे. ९ (WITH to OR into) संभोग-मैथुन करणे. १० पोर होण-विणे. To C. IN FOR हिस्सा मागणे-घेणे. To C. INTO मिळणे. २ मान्य होणे. To C. IT OVER ( colloq.) फसविणे, (चा) फायदा घेणे. To C. NEAR OR NIGH (शी) समान किंवा बरोबर होणे. To C. OF (च्या) वंशांत-कुळांत जन्म होणे. २ पासून होणे-उद्भवणे, (चा) परिणाम असणे. To C. OFF सोडून-निघून जाणे. २ सुटणे, निसटणे. ३ वटावणे, निभणे, निभावणे, पार पडणे. ४ भांडणांतून वगैरे बचावणे, आपली मोकळीक करून घेणे. ५ होणे, घटणे. ६ काही अवकाशाने होणे वगणे. ७ सुटणे (AS A GARMENT). ८ CLEARLY OR PROMINENTLY (AN IMPRESSION ) वठणे, उटाळणे, निघणे, उठणे, उमटणे. ९ जलदीनें-गर्दीतून निघून जाणे. To C. OFF FROM सोडणे, सोडून देणे. To C. ON पुढे येणे, चढती कळा होणें, उन्नति होणे. २ जवळ येणे. ३ सर्वावर येणे. To C. OUT निघून जाणे, बाहेर पडणे. २ उमटणे, उमगणे, प्रगट होणे, उघाडीस-उजाडीस-उघडकीस-प्रसिद्धीस येणे, बाहेर फुटणे. ३ शेवट-परिणाम होणे, निकाल-अंत होणे. ४ मंडळीत प्रथमच येऊ जाऊं लागणे; AS, SHE. CAME OUT TWO SEASONS AGO." ५ दिसणे, उगवणे. ६ पक्ष-बाजुतरफ घेणे. To C. OUT WITH प्रकट-जाहीर-प्रसिद्ध करणे. To C. OVER. एका बाजूपासून दुस-या बाजूस जाणे, पक्ष बदलणे. २ (अर्क. वगैरे) वर येणे. To C. OVER TO येऊन मिळणे. To C. ROUND नियमित काळाने येणे बनणे, वळचपीच्या रस्त्याने येणे. २ ( colloq.) शुद्धीवर येणे, पूर्वस्थितीवर येणे. ३ वारा फिरणे-बदलणे. ४ दया करणें, दयाई होणे, वळणे. ५ colloq. गोड बोलुन फसविणे. To C. SHORT OF पुरे न होणे. कमी होणे, उणें पडणे, कमती पडणे, To C. TO मान्य-कबूल होणे. २ naut. नांगर टाकणे. ३ शुद्धीवर-ध्यानावर-देहभानावर येणे, सावध होणे, स्मृतीवर येणे. ४ पोहोचणे. ५ एकदर मिळुन होणे, जमा होणे, भरणे. ६ (Shakes.) वंशपरंपरेनें येणे. मिळणे (चा) वारसा मिळणे. To C. TO GRIEF दु:खांत