पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/762

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Chrystalloid. ] C. n. प्राण्यांच्या वनस्पतीच्या अंतस्त्वचेत हळुहळु पसरणारा एक लरसासारखा पदार्थ m, प्रतिस्फोटक व चिकट पदार्थ m. Collop ( kol'op) [ Dut. k!op; it. coipo, a blow.] n. a small slice of meat सागुतीचा तुकडा m, मासखंड n. २ ( Shakes. ) a child मुल n, अर्भक n, संतान n; as, “God knows thou art ä collop of true flesh." ३. portion तुकडा m. [ Minced collops बारीक बारीक तुकडे केलेले मांस m. ४ स्थूलत्वदर्शक वळी f. Colloquy (kolo-kwi) [ L. col, for con, together & logui, to speak.] n. दोन किंवा अधिक माणसांने (विवक्षित विषयावरील) संभाषण n, तोंडी चर्चा f. Colloe'utor n. तोंडी चर्चा-संभाषण करणारा. Colloe'utory a. तोंडी चर्चेसंबंधी. Collo'quial n. भाषणांतच वापरलेला, बोलण्यांतच वापरलेला (लेखांत नव्हे), तोंडी चर्चेसंबंधी, संवादांतला. २ भाषणरूढ, भाषणप्रचलित, भाषणैकयोग्य. Collo'quialism n. colloquial quality or style of language बोलण्यांतल्या भाषेची रूढि f, बोलण्यांतील भाषासंप्रदाय m, बोलण्यांतील भाषाप्रयोग m, संवादांतील भाषासरणी f, बोलण्यांत व वापरण्याचा शब्दप्रयोग m. Collo'quialist n. बोलण्यांतील शब्दप्रयोग वापरण्यांत पटाईत m. २ बोलण्यांत रूढ झालेली भाषा वापरणारा. Collo'quially adv. भाषणरूढप्रयोगानें, &c. Collo'quise,-ze v. i. संवादांत संभाषणांत गुंतणे, तोंडी चर्चा करणे. Collo'quist n. एकमेकांशी तोंडी चर्चा करणारांपैकी एक, संवादांत-चर्चेत गुंतलेला मनुष्य m. Collotype ( kol'otīp) [Gr. kolla, glue & Type.] n. photo. सरसावर प्रकाशलेखाची उलटी ( negative ) आकृति घेऊन ती शाईनं दुसऱ्या कागदावर छापण्याची पद्धत f. Colluctation (kol-uk-ta'shun) [ L. col, for con, together & luctari, to struggle.] n. (obs.) लढाई f, झगडा m, हरकत f, झटापट f. Collude (kol-ud')[L. col, for con, together & ludere, to play.] v. i. to conspire in a fraud फसवणीचा कट m- कूट m- गट्टी f. करणे, कपटमंत्र m. करणे, संगनमत n- प्रतारणसंकेत m. करणे, वंचणे, वाईट कामाकरितां-फसविण्याकरितां कट m. करणे. Collud'er n. संगनमत करणारा, कपटमंत्र करणारा, संगनमती. Collu'sion n. फसवणीचा कट m, कूट n, कपट n, वंचना f, संगनमत n, प्रतारणसंकेत m, कपटमंत्र m, फसविण्याचा गुप्त बेत m. Collu'sive, Collu'sory a. संगनमताचा, फसवणुकीचा, प्रतारणेचा. Colla'sively adv. संगनमतानें, प्रतारणसंकेतानें. Collusive agreement n. law दुसऱ्यास फसविण्याकरिता केलेला पोकळ दस्तऐवज m. Collum (kol'um) [ L. neck. ) n. pl. Colla anut, the front part of the neck मानेचा पुढचा भाग m, गळा m, कंठ m, ग्रीवा f. [CERVIX (BACK PART OF THE NECK) मन्या, मानेचा मागचा भाग m, मान f. ] bot. कोंब आणि मूळ यांमधील जागा f, मोडाची ग्रीवा m.