पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/754

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पणाबद्दल जो शपथपूर्वक खात्री देतो तो, पडसाक्षी m, प्रतिसाक्षी m. २ दुसऱ्याने वेतलेली शपथ खरी आहे असें शपथेवर सांगणारा. Coke, Coak (kok) [ Possibly from the word colk which means a core, coke being viewed as the hard core of the coal left after other parts have been consumed. जसें लांकूड अर्धवट जाळून व त्यांतील उडणारे पदार्थ घालवून charcoal तयार करितात, तसेच खाणींतील कोळसा (pit-coal ) अर्धवट जाळून त्यांतील उडणारे पदार्थ घालवून coke तयार करितात.] n. the solid substance left after mineral coal has been deprived by dry distillation of its volatile constituents दगडी कोळसा जाळल्यानंतर त्याचा अवशिष्ट राहणारा अदाह्यभाग m, कोक m. C.v.t. (दगडी कोळसा जाळून) कोक करणे. Coked pa. t. & p. p. Coking pr. p. Colander, Cullender (kul'ander ) [L. colore, to strain.] n. a vessel, usually of metal, closely perforated at the bottom with small holes and used as a sieve or strainer in cookery धातूची गाळणी f, चाळण f. Colatitude ( kö-let'itūd) [Abbr. of complement and latitude. ] n. astron the complement of the latitude कोटरक्षांश m. See latitude : नतांश (खस्वस्तिकापासून खस्थज्योतीपर्यंत हगमंडलावरील में अंशात्मक अंतर त्यास नतांश म्हणतात.) Cold (kold) [ A.S. ceald, call cool, akin to Dut. koud, Ger, kalt, Dan. kold.] n. the opposite or the absence of heat हिम n, हिंव or हींव n, थंडी f, शैत्य n. २ the cold state of the almosphere, chilliness, chillness शैत्य n, थंडी f, थंडाई f, हिंव or हींव n, हिंवढी or हिंवाडी f. [ CRAMP FROM COLD काकड n, काकडी f. (v. भर) STIFF FROM C. कांकडकुडा, काकडलेला. To BE STIFF AND CRAMPED FROM C. काकडणे, गारटणे.] ३ an inflammatory condition of the mucous membrane accompanied by cotarrh पडसे n, सरदी f. ४ an indisposition of the body caused by exposure to cold सरदी f, थंडी f. [C. IN THE EYES वावशी. f.v. धर.] Cold a. थंड, शीतळ or ल, शीत, गार, शीतस्पर्श, उष्णताशून्य, नेहमीच्या पेक्षा कमी उष्णतेचा. [VERY C. काल्यासारखा-फार थंड. To BE OR BECOME C. गारसणे, गारठणे, थंडावणे.] २ (applied to weather) थंड, शीत, सरद, गार. [ BITTER, BITING, PIERCING COLD थंडगार, गारीगार, करवतासारखें गार, करवतीच्या धारेसारखें गार, गारगार थंड, गारगार ठणक.] ३ (applied to metals) न तापविलेला. ४ (applied to food ) थंड, गार, शिजवून थंड केलेला; as, C. meat, C. roast, C. porridge. ५ ( applied to persons) having the sensation of cold (usually in predicate) थंडी वाजलेला. लेला, हिंव भरलेला, थंडावलेला, कुडकुडलेला, शीतपीडित. शीतग्रस्त. To FEEL TO BE C. थंडी, हीव m