पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/752

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

caphix, cap, perhape from cupa a tub ] n. एक प्रकारची काइफ नांवाची कानटोपी f. C. v. t. टोपी घालणे. २ वेणी फणी करणे, केस विंचरणे. Coiga (koin) पायाचा दगड m, इमारत बांधतेवेळी बसविलेला मुख्य धोंडा m, कोपऱ्याचा दगड m, कोणशिला f. मुहूर्ताचा दगड m, मत्स्य m. Also coigne. Coil (koil) [O. Fr. coillir, Fr. cueillir, to gather together-L. colligere, from col (con), together and iegare, to gather. ] v. t. to gather into a ring वेष्टणे, वेंटाळणे, वेटोळे करणे, सभोवार गुंडाळणे. C.v.i (often with, about or around) वेंटाळे होणे. C.n. (as a rope) वेटाळें– m, वेंटाळी f, वळी f, कुंडले n. २ coiled mass गुंडी f, पेंडोळे n, गुंडाळी f. [Mortal coil मर्त्यदेह m, नश्वरदेह, मानवदेहाचें-मर्त्यदेहाचे वेटाळे n. २ प्रपंचाचा गोंधळ m.] Coil (koil) [Gael. goill, fume, rage. ] n. (obs) a noise, tumdi, bustle or confusion गडबड f, गोंधळ m, घोळ m. २ खडखड f, खटखट f, फडफड f. Coin (koin) [Fr. coin, formerly also coing, wedge, stamp, corner.-L. cuneus, wedge of. Coigne, quoin, Cuneiform. शेक्सपियरच्या ग्रंथांत coin शब्दाचा अर्थ कोपऱ्यांचा चिरा-दगड असा आहे. Coin शब्दाचा पाचर किंवा कमानीचा पाचरवजा दगड असाही अर्थ पूर्वी होता. Coin शब्दाचा नाणे पाडण्याचा छाप-शिका असाही आणखी एक अर्थ असल्यामुळे Coin शब्दाला नाणे हा अर्थ आला आहे. व कोपऱ्याचा चिरा किंवा दगड, किंवा पाचर ह्या अर्थी Coin शब्दाचें quoin किंवा coign हे स्पेलिंग लिहितात.] n. नाणे n, शिक्का m, मुद्रा f, मुद्रीका F. (BOREL COIN सुलखी नाणे (?). CONSISTING OF OR IN VARIOUS COINS नाणेवारी. CRACKED C. फुटकर-फुटक-कची नाणे. STAMPED COIN छापी नाणे. CRACKED OR RUBBED COIN कची ढेली.] २ नाण्याऐवजी देण्याजोगी वस्तु f, नाणे n. ३ (without pl.) रोकड नाणे-पैसा; as have not the coin to do it. C. v. t. नाणे पाडणे, शिक्का मारणें-पाडणे, अंकन-मद्रांकन करणे. २ to fabricate नवीन रचणे, नवीन तयार करणे, योजणे, बनवणे; as, To coin a word. 3 fig. to acquire rapidly as money उत्पन्न करणे, एकदम मिळविणे, तयार करणे, "Tenants cannot C. rent just at quarter day." c.v. i. (चे) नाणे पडणे. २ to manufacture counterfeit for money खोटें नाणे पाडणें ; as, "They cannot touch me for coining." Coin'age n. नाणे n. पाडणे, शिका m. मारणे, छापणे. २ मुद्रांकन n, शिका m, (पाडलेले) नाणे n. ३ नाणे पाडण्याचा खर्च m- हक m. ४ formation, fabrication, invention योजना f, रचना f, कल्पना f, निर्मिति f; as, “ This is the very C. of your brain." Coiner n. मुद्राकार m, नाणे पाडणारा, टांकसाळवाला. २ खोटी नाणी करणारा. ३ रचणारा, नवीन करणारा, कल्पक. Coin'ing n. शिक्का मारणे. २ रचणे n, रचना f. To coin