पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/751

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Cognoscenti. कोणत्याही विषयांत व मुख्यत्वेकरून ललितकलांत पटाईत हुशार-मनुष्य, कलाभिज्ञ. Cohabit ( kö-hab'it ) [L. co, together, & habitare, to dwell.] v.i. to divell with सहवास m- एकस्थान n, वास m- एकत्रवास m. &c. करणे, एके ठिकाणी रहाणे. २ to live together as husband and wife (usually applied to a man and a woman not legally married) लग्नाशिवाय नवराबायकोच्या नात्याने राहणे, दंपतीभावाने-दंपतीभाव धरून राहणे-असणे-वागणे, स्त्रीपुरुषधर्मसंसर्ग m. करणे, एकशय्या f, करणे. Cohabitant n. दुसन्यांच्या बरोबर राहणारा, एकत्रवासी m. Cohabita'tion n. (v. V. I.)-act or state सहवास m, एकस्थानवास m, एकत्रावस्थिति f. २ संभोग m, दांपत्यसहवास m, एकशय्या f, स्त्रीपुरुषधर्मानुसार वर्तन n, दंपतीधर्म m. Coheir (koar') [L. co & Heir.] n. वतनभाऊ m, वतनबंधु m, विभागी m, भागहर m, घरभाऊ m, भागी m, दायाद m, दाईज m, दायबंधु m. Coheiress n. fem. वतनबहीण, वतनविभागिनी, वतनविभागीण. Cohere (ko-hér') [L. co, together, & hcerere, to stick.] v.i to stick together' पदार्थ एकमेकांशी लगटून-चिकटून असणे. २ to be well connected जुळणे, जमणे, संदर्भाचा-जुळणीचा-संगतवार-संदर्भशुद्ध &c. असणे. ३ (obs.) अनुकूल होणे, मिळणे. Coher'ence, Coher'ency n. (पदार्थातील परमाणूंप्रमाणे एकमेकांस) चिकटून असणे, संलग्नता (?) f, संसक्ति f. २ चिकटून राहणारी वस्तु f. ३ संदर्भ m, संगति f, संबंध m, पूर्वापराविरोध m, संदर्भशुद्धि f, संवद्धता f. Coher'ent a. संसक्त, संलग्न. २ logically consistent संदर्भाचा, सुसंगत, संगतवार; as, A C. thinker. ३ (obs.) योग्य, लायक. Coher'ently adv. संगतवार, संदर्भपूर्वक. Cohe'sible a. संसक्तिक्षम. Cohe'sion n. चिकटण्याचा धर्म m, संसक्ति f. २ पदार्थांच्या कणांमधील एकमेकांस चिकटून बसण्याची शक्ति f, संसक्त्याकर्षण. २ log. पूर्वापरसंगति f. Cohe'sive a. sticky चिकटवू शकणारा. Cohe'sively adv. एकमेकांस चिकटेल-धरील अशा रीतीने. Cohe'sibiTity, Cohe'siveness n. संसक्त होण्याची शक्ति f. N. B.---Chemical Affinity हा कर्षण. Cohesion संसक्ति. Colhort (ko'hort) [ Fr. cohorte.-~-L. cohorte, cohortis, an enclosure, a court, also a band of soldiers. The living descendent of the. L. Cohortis is the English word court.] n. प्राचीन रोमन लोकांतील पायदळाची तीनशेपासून सहाशे माणसांची तुकडी f, सहा शंभरी f, षट्शती. २ लढाऊ शिपायांची सहाशंभरी . ३ घोडदळाची सहाशंभरी. ४ कुमकेच्या शिपायांची टोळी f. ५fig. एकाच कामाकरितां जुळलेल्या लोकांची टोळी f. N. B.-पांचहजारी, चारहजारी या जुन्या बखरीत सापडणान्या शब्दांच्या धर्तीवर सहाशंभरी हा शब्द बसविला आहे. Coif (koif) (О. Fr. coife, Fr. coiffe, -L. L. cofia Fr.