पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/742

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Cock (kok) [A. S. cve, perhaps in imitation of the cry of the cock. cf. sk. कुक्कुट.] n. कोंबडा m, चरणायुध m. २ वायुकुक्कुट m, वायुगतिदर्शक-वायुगतियंत्र n. (कोंबड्याच्या आकृतीचें). ३ वायुध्वज m, वायुज्ञापक n. ४ humorous नायक m, पुढारी m, म्होरक्या m; as, He is the C. of our party. [C. OF THE WALK धारवार m, बुटनाईक m, टिकोजो m, टिकोबा m, बडेमिया m, म्होरक्या m. C. of one's own walk आपल्या घरचा थोर राजा. WILD C. रानकोंबडा m, वनकुक्कट n.] ५ male of birds नर m; as, Cocksparrow. ६ (of a gun ) घोडा m. ७ ( of hay) गंजी, गंज m. f, ढिगार m. ८ (of a balance) कांटा m. ९ (of a hat, turban) झांक m, कोचकी f, चोंच f, कोकी f, राघू m, कोंब m. १० spout कुलपी तोटी f, मळसूत्री तोटी f. [ Cock and bull story cf. कुत्र्या मांजराची गोष्ट f.] ११ (obs.) प्रभातकाळ m, (obs. ) कोंबडेआरवणी f, अरुणोदय n.; as, He begins at curfew and walks till the first C. १२ आड्याखालचा पोटमाळा m. १३ होडकें n. Cock v. t. ( the ears) (पाहतांना) कान m. टवकारणें-उभारणे, चढविणे. २ (the nose ) नाक n. वर करणे-फुगवणे. ३ (a gun) घोडा m. चढवणे-खेचणे. ४ (डोळा) मिचकावणे-घालणे मारणे. ५ निमुळती गंजी करणे, उटी घालणे. ६ टोपी वगैरे कलावर-कलती-वांकडी घालणे. C. v.t. ऐट f- गर्व m. आणणें, ऐटीत चालणे, नखऱ्याने ठुमकत चालणे. Cockade'n. (काहीएक खुणेकरिता) टोपीवर लावण्याचा फितीचा झुबका m. Cockald'rum n. लब्धप्रतिष्ठित हलका मनुष्य m. २ मुलांचा एक प्रकारचा खेळ m. Cock'-broth n. कोंबड्याचा रसा m. Cock'chafer n. एक सपक्ष किडा m. Cock'-crowing n. आरवणी f. कोंबड्याची आरवणी f, कोंबड-साद f. २ dawn कोंबड-पहांट.f. At C. कोंबडेआरवणीस, कोंबडसादीस. Cocked a. उभारलेला, कलावर-झोंकावर घातलेला, झोंकदार, टवकारलेला. Cock'er n. रानकोंबड्यांच्या झुंडीमागे जाणारा स्पॅनिअल जातीचा कुत्रा m. Cock'brained a. अविचारी, हट्टी, आग्रही. Cock-boat होडी f, होडकें n. Cock'atoo n. एक जातीचा तुरा असलेला राघूसारखा पक्षी m, काकातू_m, काकाकुवा m. Cock'e-rel, Cock'le n. लहान कोंबडा m. २ तरुण मनुष्य, तरणा बांड. Cock'le-brained a. मुर्ख. Cock'-eye n. तिरवा डोळा m. Cock-eyed a. तिरवा-का. Cockfight,-ing n. कोंबड्याची झुंज f. Cock-head n. mech. eng. निमुळतें डोके n. Cock'-horse n. लहान मुलाचा खेळावयाचा नकली घोडा m. २ (R.) उंच घोडा m. C. a. घोड्यावर बसलेला. २ exultant, triumphani अभिमानी, कारवा वाजविणारा, आनंदोन्मत्त. Cock-loft n. शेवटच्या मजल्यावरची छपराच्या खालची खोली f, पोटमाळा m. Cock-match n. कोंबड्याची झुंज. Cock-pit n. कोंबडे झुंजवण्याचा आखाडा m. २ वेस्टमिनिस्टर येथील प्रिव्ही काउन्सिलची बसण्याची जागा f. ३ लढाऊ जहाजांत