पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/740

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माणसांस) उरी-पोटी धरणें or गोंजारणे, चाटूक्तीने or गोड शब्दाने शांतवन n. करणे. To C. a female आई. बाई करणे. To C. a male दादाबाबा करणे, बाबापुता करणे. Coax, Coax'er n. आळवणारा, आर्जवी, आर्जवू. Coaxed. a. आळवलेला, प्रार्थित, लाडका. Coax'ing n.-act. आळवणे n, लाडीगोडी f, लाडकेपणा m, लुलुपुतू, आर्जव n, गुळगुळथापडी f, लालन n. Coax'ing n. (See verb.) Coax'ingly adv. लाडीगोडीने, लाडीकपणाने, दादा बाबा-आईबाई करून, लाडेंकोडें. Co-axial (ko-ak'sial) [L. co. & Axis.] a. एकाच अक्षाचा, एकाच आंसाचा, एकाक्षक. Cob (kob) [A. S. cop, copp, head, from Welsh cob,n top, a tuft.] पुढारी m, म्होरक्या m, बडा मनुष्य m. २ Cobswan, which see. ३ a short-legged stout pony आंखूड पायाचा मजबूत तट्टू m. ४ फळांतील वाटोळी बी f-आठीळ f-गर m. ५ अंड m. ६ गवताची वाटोळी गंजी f-उडवें. ७ वाटोळा पाव m. ८ दगडा कोळशाचा वाटोळा गड्डा m. ९ शाळूच्या-मक्याच्या कणसांचे वाटोळें बाडें n. १० बियांतील वाटोळा काेंब m. ११ केसांचा वाटोळा झुबका m. १२ गवत घालून कमावलेली चिकण माती f, गिलाव्याची माती f. १३ ढुंगणावर फटके मारण्याची शिक्षा f. Cob wall n. कूड m. २ गवत घालून कमावलेल्या मातीने उभारलेली भिंत f. C. v.t. prov. मारणे. २ mining हातोड्याने फोडणे-लहान तुकडे करणे. ३ naut. वादीने ढुंगणावर फटके मारून शिक्षा करणे. Cobalt (ko'bawlt) n. [ Ger. kobold, the goblin or demon of Germen mines. ] chem. रसायनशास्त्रातील कोबल्ट नांवाचें मूळ तत्व n, ह्याचा रंग तांबूसकरडा असतो. Cobalt'ic a. कोबल्टाचा-संबंधी. Co'baltine (tine ) n. तालाबरोबर (arsenic) मिसळलेले खाणीतील अशुद्ध कोबल्ट. Cobble ( kobl ) n. गोटा m, गुळगुळीत घडलेला गोटा m. Cobble-stone n. फरसबंदीचा वाटोळा घडलेला धोंडा m. C. v. t. वाटोळ्या धोंड्यांनी फरसबंदी करणे. Cobble ( kob'l) v.t. to mend (Shoes) (जुने जोडे) तांगडणे, ठिगळ मारणे, जशाचा तसा सांधणे. २ to make or do clumsily, to bungle ओबडधोबड करणे, अनाडीपणाने करणे-झोडणे; as, To C. rhymes. Cobb'ler n. (v. V. t.) जुने जोडे तांगडणारा, ठिगळ f. मारणारा, चांभार m. २ अनाडीपणाने काम n, करणारा, दगडघाशा, झोडणारा, झोडकामी. ३ दारू f, लिंबू n, साखर व बर्फ यांचें केलेले सरबत n. Cobb'lery n चांभारकी f, चांभारकाम n. Cobbler's punch दारू लिंबू, साखर वगैरेचें केलेलें एकपेय n- पंच. Cobelligerent (köbel-ij'-e-rent) (L. co, with, bellum, war & gerere, to wage.] a. or n. एकाद्या राष्ट्राशी दुसऱ्याच्या मदतीने लढाई करणारे राष्ट्र n. Cobra, Cobra de capello ( ko'bra, koʻbra-deka.pe'lo) [Port, cobra, also cobra de capello, i. e. a serpent