पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/739

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धरून जाणे, किना-याने हाकारणे. २ एका बंदरापासून दुसऱ्या बंदरी जाणे. ३ उतरणीवरून घसरत जाणे. C. v.t. किनाऱ्याजवळून गलबत हांकारणें. Coast'er n. किनाऱ्याजवळून जाणारें गलबत n, किंवा माणूस n. Coast-guard n. सीमारक्षक. २ वेलारक्षक, समुद्ररक्षक m- सैन्य n. Coast'ing a. एकाच राज्यांतील निरनिराळ्या बंदरी व्यापार करणारे, किनाऱ्याजवळ राहणारे. C. n. किना-याचे बाजूस हांकारणे-व्यापार m. करणे. २ वर पाय सोडून बायसिकल उतरणीवर चालवणे n. ३ उतरणीवरून खाली घसरत जाणे n. Coasting-trade n. एकाच देशाच्या निरनिराळ्या बंदरांमधील व्यापार m. Coastline n. किनाऱ्याची हद्द f, किनारा m. Coast-waiter n. (जहाजांत माल चढला अगर उतरला ह्यावर देखरेख ठेवणारा) जकातखात्यांतील बंदरकारकून m. Coastward,-s. adv. किनाऱ्याकडे. Coast'wise adv. किनाऱ्यावरून. C. a. किना-याजवळून हाकारलेलें. The coast is clear fig. भय नाहींसें झालें, रस्ता मोकळा आहे,शत्रू पळाला. Coat (kot) [O. F. cote, Ger. kotte, a coat.] n. आंगरखा m, डगले m, डगला m, कोट m. २ अमुक एक धंद्याचा पोशाख m, वस्त्रे, धंदा m; as, Men of his C. ३ an integument, a covering कवच n, आच्छादन n, आवरण, सोडण n, चोड n, चंवड vul., (नारळाचें) कंचुक. ४ (of the eye) पडदा m, पटल n.' ५ layer', fold, crust थर m, पापुदरा m, पदर m, पडदा m. ६ (of paint, mud, cowdungwash) लेप m, लेवा m, लिंपण n, लपेटा m, सारवण n, हात m; as, A C. of varnish. ७ चतुष्पादांचे केस. ८ (obs.) राजा, राणी किंवा गुलामाचे चित्र असलेला पत्ता m. Coat of mail armour बक्तर n, चिलखत n. Great C. or cloak मोठा पायघोळ आंगरखा m. Cut your coat according to your cloth आंथरूण पाहून पाय पसरणे, (आदा) पाहून खर्च करणे. C. v.t. आंगरखा m- डगला घालणे. २ मढवणे, थर m-पूट m. देणे; as, To C. a jar with tin कल्हई f. करणे. Coat-armour, Coat of arms n. कुलमानद्योतक रंगाने दाखविलेली ध्वजादि चिन्हें n. pl. Coat-card.n. बादशहा, राणी किंवा गुलामाचा पत्ता (खेळण्याचा). Coatee' n. पाठीमागे शेपटें लोंबणारा आंगरखा m, लांब शेपटांचा आंगरखा m. Coat'ing n. हात m. (in painting), कवच n, आवरण n, पुट m, लेप n, लिंपण n, आच्छादन n. २ आंगरख्याचें-कोटाचें कापड n. A Coat of white wash सफेत्याचा हात. To turn one's coat स्वतःची मतें बदलणे, एक बाजू f, पक्ष m. सोडून उलट बाजू-पक्षाकडे जाणे. Turn-coat n. जो आपली मते अथवा पक्ष एकदम सोडतो तो m. Coax (koks) [From O. E. cokes, a fool; to coax one being thus to make a cokes or fool of him. ] v. t. to persuade by soothing words, to wheedle फुसलावणे, थापटणे, (कार्यसाधू किंवा हलक्या दर्जाच्या माणसांनी) आळवणे, आर्जवणे, (ची) लुलुपुतु-आर्जव करणे n, लाडीगोडी f. लावणे, (मुलांस किंवा दुःखाक्रांत