पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/728

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कपड्यांचा ब्रश m, कपड्यांचा बरास m. Clothes: horse, Clothes-screen n. कपडे वाळत घालण्यासाठी केलेला लांकडी घोडा m. Clothes'moth n. कपडा खाणारी कीड f, कसर f, कीड f. Clothes'-pin n. कपडा दोरीवर नीट रहावा म्हणून त्याला लावलेली आपोआप बसणारी टांचणी f, अडकवण n. Clothes: press n. कपड्यांची पेटी f-कपाट n, कपडेपेटी, कपड़े कपाट. असल्या कपडेपेटीत कपडे घड्या करून ठेवितात व कपडेकपाटांत उभे टांगून ठेवितात. २ कपड दाबण्याचे यंत्र n. Cloth-hall n. कापडबाज़ार m. कापड-अड्डा m. Cloth'ier n. कापडकरी. २ कपडे तयार करणारा व विकणारा. Cloth'ing n. पांघरूण n, पांघरुणे, वस्त्रप्रावरण n, कपडालत्ता m, पोशाख m, अंबर (S) n, रोज (वापरण्याचें) धडोत n. २ बिछान्यावरचे कपडे (चादर वगैरे). Cloth-yard n. कापड मोजण्याचा वारयार्ड-गज m. Cloth of gold. n. भरजरी कापड n. Cloth-yard shaft n. वार लांबीचा तीर m. N. B..-Some kinds of Cloth in India are : अनरस, अलिता, किंतान, खंडकी or खणसी, खादी, खारवा, खाराऊ or व, खुतणी or नी Cr कुंतनी, खेंडा, खेंस, गंगाजमनी, गजनी 'गर्म सुती कापड, गुजरी, गेटम, धनवेल, चकला, चंद्रवाळा जामदानी, जोट or ठ, झोऱ्या, दोरवा, नाक, परकाळा, or ळें, मशरू, मादरपाट, रोवेरी, शालू, सुजनी, सुताडा, सुसी, हमरू. N. B-Clothes हा शब्द केव्हा केव्हा Bed-clothes किंवा Swaddling-clothes (बाळत्यांतील कपडे) ह्यासाठी वापरतात. Clotpoll see Clot. Cloud ( klowd) [M. E. clorul, orig. a mass of vapours, the same word as M. E. clud, a mass of rock. A. S. clud, a hill or hillock, the application arising from the frequent resemblance of clouds to rocks or hillocks in the sky or air.] ढग' m, मेघ m, अभ्र n, घन m, पयोधर m, जलद m, मळभी f. [The clouds (collect.), the cloudy sphere घनचक्र n, मेघ-मंडल n, धनमंडल n, मेघनाला f, बादल n, मळभ n. Canopy of clouds अभ्रपटल n, अभ्रवितान n, मेघवितान n. Dense array or mass of clouds घनघटा f, मेघघटा f. Empty C. वांझे ढग, रिते ढग. Gathering of clouds भरलेले आभाळ n, धोंगट n, धनजाल n, मेघजाल n, अभ्रजाल n. Threatening or lowering of the clouds मेघडंबर or मेघाडंबर n. The cloud have gathered, are lowering मेघानी छत्र धरले, आभाळ भरून-दाटून आले, आभाळ आलें, मेघांनी or पावसाने झांपड घातली-आंधारी घातली, आभाळ or पाऊस डवरला, पाऊस m. भरून आला, काळोखी आली. To be covered with clouds डबरणे or डोरणे, भरून येणे To be clear of clouds ( the sky) निवळणे, निखरणे निरग्र होणे. To gather thickly (clouds) वोंगाडणे.] २ (of. dust ) धुरळा m, धुळीचा लोट m, रजाेमेघ m. ३ (of smoke) धुराचा लोटा m, धूम्रमेघ. ४ शुभ्र पदार्थावरील काळा ठिपका m, डाग m, कलंक m, खोड f. ५.fig.