पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/714

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सबंध-पुरा दिवस m; as, The bonds must be left three clear days for examination. Cleared' a. ‘मळ छाटलेला, शोधित. २ मोकळा केलेला. ३ चोखलेला. ४ फेडलेला, वारलेला, बेबाकी, फिटंफाट. To be cleared फिटणे. Clear'er n. साफ करणारा. Clear-cut a. having a sharp, distinct outline स्पष्ट मर्यादा.असलेला, सुमर्यादित. Clear-eyed a. मर्मज्ञ, भेद पाहण्याची शक्ति असणारा. Clear-headed a. विमलमति, विशदबुद्धीचा, साफ डोक्याचा. Clear-head n. साफ डोकें n, सर्व गोष्टी स्पष्टपणे कळण्याची बुद्धि f, विशदबुद्धि f - मति f. Clearing n. साफ करणे n, निकाल-लावणे n. २ हुंडीवाल्या लोकांनी एकमेकांच्या हुंड्या एकमेकांस देऊन हिशोब चुकता करण्याची रीत f, हिशोब चुकता-पूज्यकरणे n. 3 a tract of land cleared of wood for cultivation शेतकीकरितां झाडे तोडून साफ केलेली जमीन. Clear'ing-house n. ज्याठिकाणी हुंडीवाल्यांच्या हुंड्या एकमेकांना देऊन हिशोब चुकता करण्याचे वगैरे काम चालतें ती जागा f Clearing-nut n. ईस्ट इंडीजमध्ये गढूळ पाणी निवळवण्याचे स्टिक्नॉस् पोटॅटोरमचें बी, निवळीची बी f. Clear'ing-solution n. द्रावण. Clear'ly adv. plainly उघड, प्रत्यक्ष, साफ, स्पष्ट, निवळ, साक्षात्, धड, धडधडीत. Clear'ness n. स्वच्छता f, निवळपणा m, सफाई f, निर्मलता f, निर्मलपणा m. २ निरभ्रता f, स्वच्छता f, प्रसाद (S) m. ३ उघडेपणा m, स्पष्टता f, विशदता f. ४ उघडेपणा m, मोकळेपणा m, प्रशस्तता f, खुलासा. ५ व्यक्तता f. Clear-seeing a. तीक्ष्ण डोळ्याचा. २ तीक्ष्ण बुद्धीचा. Clear-sighted a. विशदबुद्धीचा, मर्मज्ञ, दूरदर्शी, प्रज्ञावान्. Clear-sightedness n. acute discernment दूरदर्शित्व n. Clear-starch'er n. खळ देऊन कपडे कडकडीत करणारा धोबी. Clear'-starching n. खळ लावून कडकडीत इस्त्री करणे n. Clear story n. (va. riant of Clerestory) ख्रिस्ती देवळाच्या मध्य भागांतील मजला m. Clear-style (of writing) लिहिण्याची सुबोध पद्धत f, प्रसन्नता f. Clear-voice n. स्वच्छ (घोगरा नव्हे असा) आवाज m- स्वर m. To C. off चल नीघ. To C. out जाणे, निघून जाणे, वाट f धरणे. To C. an examination paper घातलेले अगर विचारलेले सर्व प्रश्न सोडविणे. To be cleared out जवळ एक पै देखील नसणे; as, I am quite cleared out माझ्या जवळ एक देखील नाही. Clear articulation स्पष्टोच्चार. Clear conscience निर्दोष अंत:करण. To clear the ground fig. अडचणी दूर करणे. To clear the course मार्ग खुला करणे. Clear sky निरभ्र आकाश. To clear the throat घसा साफ करणे. २ fig. विचार बोलून टाकणे. To clear up भीति, शंका किंवा चिंता योग्य स्पष्टीकरणाने दूर करणे. Coast clear (आगबोटींना दिलेला इशारा) किनारा निर्भय (आहे.) Line clear रस्ता खुला-मोकळा, आगगाडीला रस्ता निर्भय आहे अशी खुणेने माहिती देतात त्यास ह्मणतात. To keep clear of च्या भानगडीत न पडणे, पासून अलिप्त राहणे. To get clear of संकटांतून पार पडणे.