पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/672

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मेळ, ताळ(ल)मेळ m, समस्वर (pop.) समसूर m. [ C. BEATEN AT THE END OF A WATCH गजर m (v. वाजणे, होणे.) CLOSING C. OR PEAL (AS, OF A चौघडा &c.) उतार m, उतारबाजी.] देवळाच्या घुमटांत टांगलेल्या पुष्कळ घंटा f.pl. C.v.t. ताल मिळणे, जमणे. २ जम-मेळ बसणे, (शी) संगत (S.) असणे (followed by in or in with ). C.v.t. घंटांचा समनाद करणे. २ राग-ताल गाणे. ३ मंत्र म्हणण्याची वेठ मारणे. Chime, Chimb (chim) [Ger. kimme, edge. ] n. लांकडाच्या पिपाची कोर f-कांठ m. Chimera, Chimæra (ki-mē'ra) [L. chimera, from Gr. chimaira, & she-goat, a fabulous animal that vomited fire.] n. a fabulous or unreal thing असंभवकल्पना f-पदार्थ m. [AS, वाळूचे तेल, सशाचे शृंग , आकाशपुष्प, कर्पूरभस्म, वंध्यापुत्र m.] २ a monster represented as vomiting flames and as having head of a lion, the body of a goat and the tail of a dragon ज्याचे तोंड सिंहासारखें, धड बोकडासारखे, शेपूट सापासारखे आहे असा ग्रीक लोकांच्या पुराणांसरी वर्णन केलेला तोंडातून ज्वाला बाहेर टाकणारा प्राणी m, किमिरा नांवाचा राक्षस. Chimeric-al a.(v. A.) merely imaginary असंभवकल्पनेचा, असत्कल्पनेचा कल्पनासिद्ध-जात-&c., मानसिक, काल्पनिक, कांदबरीय, असंभाव्य. Chimer'ically adv. Chimney (chim'ni) [Fr. chemineer-L. caminus, a furnace, a fireplace.] n. a vent for smoke धुराबें n, धुराळें n, धूमनलिका f, धारें n. २ a glass for the flame of a lamp (दिव्याच्या वातीवर ठेवण्याची), काचेची नळी f, चिमणी f. pl. Chimneys. Chimney-board n. चूल झांकण्याची फळी f, चुलीची झांकणफळी f. Chimney-Can. C-pot n. चिमणीत जास्त हवा खेळण्याकारिता लाविलेला मोठा नळ m. Chimney-hook n. Chimney-money n. चुलीवरील कर-पट्टी f, piece n. घरांतील चुलीच्या धुराड्यावर बसविलेला नकशीचा दगड-बांधकाम n. Chimney-shaft n. (छपरापेक्षा) उंच स्वतंत्र धुराडे m. Chimney-sweeper n. धुराडे झाडणारा m. Chimney-top n. धुराढयाचा घुमट m-Chimney-pothat चिमणीसारखी उंच टोपी f. Chimpanzee, Chimpansee ( chim-pan'.ze ) n. एक चिंपान्झी जातीचे वानर n. Chin (chin ) ( A. S. cin, akin to Dut. kin; Ger. kinn; Icel. kinn, check ; L. gena; Gr. genus; SK. हनु, the jaw.] n. हनु (न) वटी f, हनु f. colloq. दाढी f. Chin-ache हनुग्रहवात m, हनवात m, हनुदु:ख n. The hollow above the chin बचाळी, बेचाळी f, बेंचाळें n. China (chin'a ) n. chinaware चिनी काम n, चिनी भांडे n. China-clay n. (भांडी करण्याची पांढरी) चिनी माती f. China-fire n. एक प्रकारची उडवावयाची चिनी दारू f. China-grass n. चिनी गवत n, एक प्रकारचे चीन देशांतील गवत n. China-ink n. चिनी शाईच्या वड्या f. pl.