पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/671

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाळासारखा, पोरसौदा. २ साधा, सरळ, लेंकुरबुद्धीचा. A child-wife पोरवयात लग्न झालेली बायको.

Childermas-day (chil'der-mas-da) [ A. S. cild, a child, mcesse, mass & deeg, day.] n. 'निर्दोषांचा' दिवस m. हेरॉड याने ता. २८ डिसेंबर रोजी ठार मारलेल्या मुलांची स्मारक तिथि f. Also called the Holy Innocents' Day. Chiliad ( kil'i-ad ) [Gr. chilioi, a thousand.] n. a period of a thousand years सहस्र वर्षे. २ सहस्रपट, कोणत्याही वस्तूची हजारपट, सहस्रक m, सहस्र m, हजार. Chiliagon n. सहस्रकोनाकृति. Chil'iahedron n. सहस्रभुजाकृति. Chilian, Chiliarch n. सहस्रसेनानायक. Chil'iarchy n. सहस्रसेनानायकाचा हुदा m, सहस्रसेनानायकत्व n. Chil'liasm n. the millennium खिस्त एक हजार वर्षे पृथ्वीवर राज्य करील असें मत. Chil'iast n. ज्याचें असें मत आहे तो.

Chill (chil) [A. S. cele, chill.] n. (v. A. 1.) सरदी f, शिळट (R). शिळटी (R) f, थंडी f, गारठा m. [OF WHICH THE C. IS TAKEN OFF शिळबुडा, शिळमोडा, TO TAKE OFF THE C. OR TO LOSE ITS C. (-water) पाण्याचा कांटा m. मोडणे.] २ a chilly feeling हिंव n, हिम n, हुडहुडी f, कुडकुडी f, रेपा f. pl, शैत्य n. [CHILLS AND FLUSHINGS सरदगरमी.] ३ fig. हर्षभंगनाउमेद करणारी गोष्ट. ४ थंड करून कठीण करणारा ओतकामाचा सांचा m. C. a. (of the air or things) सरद, शीतल, गार, हिम, थंड. २ (of the feeling) थंडावलेला, कुडकुडलेला, हिंव or हिंवकुडकुडी भरलेला. ३ without warmth or cordiality, formal, distant थंडाईचा, अनादराचा, बिनकळकळीचा; as, A C. reception. ४ हुडहुडी भरविणारा. ५ हिरमुसलेला, धैर्य खचलेला. C.v.t. on to be affected with cold.थंडी भरणे, हिंव येणे, हिंवणे, हिवंडणे. २ to be chill-struck (plants) शिळटणे. C. v. t. to make chilly सरदी-थंडी &c. करणे. २ to dispirit मोडणे, पाणी n. घालणें-ओतणे, हिरमोड f-हिरसांड f-करणें, नाउमेद करणे. ३ उष्णता एकदम कमी करणे (of a piece of red hot iron). Chilled a. थंड केलेला. २ थंड करून लोखंडाप्रमाणे कठीण केलेला-झालेला. ३ भग्नोत्साह a. Chilliness n. गारवा m, थंडी f, सरदी f. Chilling a. थंड, सरद mech. eng. (थंड करून) कडक करणे. Chill'iness n. Chilly a. थंड झालेला, हिंव भरलेला. Chill-casting. mech. eng. कडक करणे. Chilli (chil'li ) [Sp. chile, the pods of Cayenne or Guiana pepper, vide Capsicum.] n. मिरची f, मिरशंग-शेंग f.pl. Chillies pounded into a mass तिखट n (colloq. & fig.) चाबूक m. Red Chillies pounded भगवती f, भसकापुरी f. Some other spellings of Chilli are Chili, Chilie & Chilly.

Chillum (chil'um) [Hind. chilam.] n. चिलीम f.

Chime (chim) [O. Fr. cymbe, cymble.-L. cymba-lam, a cymhal.] n. (घंटांचा अथवा गायनवाद्यांचा) स्वर.