पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/667

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

deposit in a chest (पेटीत) संचय करणं, सांठवणे. Chested a. छाती असलेला. Chest-foundered a. उरी भरलेला,-गेलेला-फुटलेला. [To be C. उरी भरण.] Chest-note n. खोल आवाज m- स्वर m. Chest-nut, Ches-nut (ches'nut) [For chesten-nut, O. E. chestein, chesteigne.-O. Fr. chestaigne.-L. castanea, the chest-nut tree, from Gr. kastaron, from Castana, in Pontus, where this tree abound. ed. ] n. (fruit) चेस्नट नांवाचे काळसर लाल फळ n. २ (tree) चेसूनट नांवाचे हाड n. ३ चेस्नट झाडाचें लाकूड n. ४ (घोड्याच्या पायांच्या आतल्या बाजूस वर आलेले) चेस्नट फळासारखें हाड n. ५ चेस्नट फळाच्या रंगाचा, काळसर-तांबूस रंगाचा घोडा m. ६ तांबूस पिंगट रंग m, अळीत्याचा रंग m. ७ slang मस्करीची गोष्ट f. C. a. कस्तानी, काळसर तांबूस रंगाचा, तेल्याकुमाईत. Cheval-de-frise (sheval-de-fréz) [Fr. lit. 'horse of Friesland'; because first employed by the Frisians in their struggles for freedom during the latter half of the 17th century to supply their want of cavalry]. n. भाल्यांचे आडण n, घोडे m, लोखंडी किंवा लांकडी तुळयांमधून आरपार व तिरकस भाल्यांच्या टोंकांच्या कांबी किंवा काठ्या लावून अरुंद रस्त्याने येणाऱ्या शत्रूचा अटकाव करण्याकरितां किंवा मोरचेबंदीतील फटी खुजवण्याकरिता केलेली योजना f. २ भिंतींतून वर आलेले भाल्यासारखे लोखंडी गज, शतनी ? कारलें ? pl. Chevaux-de-frise. Cheval'-glass ( sheval'-glass) [ Fr. cheval, a horse & Glass]. n. चौकटीत बसविलेला मोठा झुकता आरसा m. Chevalier (shev-a-lēr')[Fr. cheval, Sk. अश्व , a horse, See Cavalier.] n. शिलेदार m, घोडेस्वार m, सरदार m, शूर शिपाई m. २ स्त्रीप्रेमी (तरुण मनुष्य). Chevalier d'industrie n. ठक, लुच्चा, खिसेकातरू. The Chevalier St. George एडवर्डस्टुअर्टचे एक उपनांव. The Young Chevalier एडवर्डस्टुअर्टचा मुलगा चार्लस एडवर्डस्टुअर्ट m. Cheverel (chev'er-el ) [ Fr. chevre, a goat.] n. करई n. २ करडाचे मऊ कातडें n. ३.fig. अतिकोमलता f. C. a. बकऱ्याच्या चामड्याचे बनवलेलें, चिवट. २ अतिकोमल, सौम्य; as, Cheverel conscience. Webster spells 'Cheverel' as 'Cheveril'.

Chew (choo) [G. kauen, to chew. ] v. t. to masticate चावणे, चर्वण करणे g. of o. २ to roll in the mouth, to champ चावणे, चघळणे. [ To C. the cud रवंथ - वागूळ n. करणे.] ३.fig. to ruminate mentally, to meditate on घोळणे, जपमाळ f स्मिरणी f घेणे g. of O., fig. मनन करणे, एकाच गोष्टीविषयीं पुनःपुनः विचार करणे. C.v.i. to ruminate upon. ध्यान n. करणे लावणे. २ to chew tobacco, (तंबाखु. ची) गोळी चढविणे, चघळणे. C. n. चर्वण केलेला पदार्थ m. २ spec. तंबाखूचा बार m. Chewing n. (v. V. T. 1.) n. चघळणे n, चर्वण n.