पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/665

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Chemolysis ( ke-mol'i-sis ) [ Chemical & Gr. lysis, a loosening. ] n. decomposition of organic substances into more simple bodies by the use of chemical agents alone रसक्रियामात्रपृथक्करण n, रासायनिक कार्यकारीद्रव्यांच्याच योगाने केलेलें सेंद्रिय पदार्थांचे पृथक्करण n. Chemosmosis (kem'-oz-mo-sis) Chemical & Gr. osmosis, which see.] n. a. chemical action taking place through an intervening membrane मध्यस्थीत अंतर्त्वचेच्या द्वारे होणारी रासायनिक क्रिया. Chemosmotic a. मध्यस्थित अन्तर्त्वचेच्या द्वारे होणान्या रसायन क्रियेसंबंधी. Chenille (she-nēl') [Fr. a caterpillar. ) n. स्त्रियांच्या पोशाखाकरितां कशीद्याकरितां अथवा झालरीकरितां रेशीम वगैरेचा झुबकेदार दोरा. Chenomorphæ (kē'no-mor-fi) (Gr. chyn, the wild goose, and morphe, form.] n. zool. राजहंस-हंस-सारस-बदकें इत्यादि पक्ष्यांची जाति f, हंसजाति f. Cheque, Check (chek) [vide Check.] n. an order for money (दाखविल्याबरोबर पैसे देण्यासाठी) सावकारावर-पेढीवर चिट्ठी f, चेक m, चक m, हुंडी f, दर्शनी हुंडी f. Cheque-book n. हुंडीच्या तक्त्यांचे पुस्तक n, चकबुक n. Cheq'uer, Check'er n. चौपट m, पट m; रंगीबेरंगी पट m. २ pl. पटावर खेळणारी मंडळी f. ३ पैशांचा पटावरील खेळ m. ४ चित्रविचित्र काम N. C. V. t. to variegate, to diversify रंगीबेरंगी करणे, जाळीदार-खिडकी-दार करणे, नानाप्रसंगयुक्त करणे, निरनिराळ्या प्रसंगांनी चित्रविचित्र करणे. Chequered, Checkered a. चित्रविचित्र रंगविलेलें, रंगीबेरंगी, चित्रित, जाळीदार, कर्बुरित, खिडकीदार. २ नानाप्रसंगयुक्त. Chequer-work n. (निरनिराळ्या रंगांचे) चित्रविचित्र काम n. Blank cheque n. (पैशाचा आंकडा न घालतां) सही केलेली कोरी हुंडी f. Cross,- Crossed cheque n. आडव्या किंवा उभ्या रेघा मारलेली हुंडी f, चेक m. (ज्या हुंडीवर ती एखाद्या दुसन्या पेढीवाल्याच्या मध्यस्थीने वटवावी हे दर्शविण्याकरितां) दोन आडव्या किंवा उभ्या रेघा मारलेल्या असतात अशी हुंडी f. Cheque to bearer ज्याच्या हाती असेल त्याला पैसे घेऊ देणारा चेक m. Cheque to order नादलेल्या मनुष्यास व त्याच्याच वतीच्या दुसऱ्या मनुष्याला पैसा घेण्याचा हक्क देणारा चेक m.

N. B.-Cheque हा इंग्रजी पद्धतीने चालणा-या पेढीवर किंवा व्यांकेवर देतात. चेक दाखविल्याबरोबर पैसे मिळतात. हुंडी चेकाहून भिन्न आहे. ज्याच्यावर हुंडी केलेली आहे त्याला ती हुंडी दाखविली असतां तो ज्याला पैसे भरावयाचे आहेत त्याचेकडे नेऊन भरताे. हुंडीचे पैसे चेकासारखे रुजू केल्याबरोबर ताबडतोब मिळत नाहीत.

Cherif, (sher'if) n. मक्का येथील शेरीफ m. २ काजी M.

Cherish (cher'ish) [M. E. cheriss,-isch, from Fr. cheris from Fr. cherir, to cherish or to hold dear from cher, dear. ह्या शब्दाचा मूळ अथे लढी -